शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहात गाजले जयश्री अत्याचार प्रकरण

By admin | Updated: July 29, 2016 23:58 IST

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अनेक कठोर कायदे अस्तित्वात आहेत.पण, म्हणून त्यांच्यावरील अत्याचार कमी झालेले नाहीत.

यशोमती ठाकूर आक्रमक : सभापतींनी दिले चौकशीचे आदेश अमरावती : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अनेक कठोर कायदे अस्तित्वात आहेत.पण, म्हणून त्यांच्यावरील अत्याचार कमी झालेले नाहीत. कारण वा निमित्त कोणतेही असो दरवेळी अत्याचाराचा बळी महिलाच ठरतात, असे का? असा संतप्त सवाल आ. यशोमती ठाकूर यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधीमंडळात उपस्थित केला. जयश्री दुधे या महिलेला वर्षभर डांबून ठेवल्याचे प्रकरण सभागृहासमोर विशद करून आ. यशोमतींनी समाजातील अनेक पीडित, शोषित महिलांच्या व्यथांनाच एकप्रकारे वाचा फोडली. सभापतींनी या गंभीर मुद्याची दखल घेवून शासनाला चौकशीचे निर्देश दिलेत. यशोमतींच्या या प्रश्नाने सभागृह अवाक झाले होते. माहुर येथील सासरच्या मंडळींनी जयश्री दुधे हिच्यावर अनन्वित अत्याचार केलेत. एक महिला आमदार म्हणून आ. यशोमतींनी जयश्रीची भेट घेऊन तिचे सांत्वन केले. तिला धीर दिला. न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. महिलांसाठी कठोर कायदे अस्तित्वात असून सुद्धा महिलांचा येनकेनप्रकारेण होणारा छळ थांबत नाही. त्यामुळे हे कायदे अधिक कठोर करण्यासोबतच कर्तव्यदक्ष सरंक्षक अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणीही आ.यशोमती ठाकूर यांनी सभागृहात रेटून धरली. आ.ठाकूर यांनी औचित्याच्या मुद्यादरम्यान महिलांविषयक कायद्यांमध्ये बदल करून या कायद्याच्या अमंलबजावणीकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली. महिलांसाठीच्या कायद्यात बदल हवाअमरावती : अमरावती जिल्ह्यातील रहिवासी जयश्री हिचा विवाह नांदेड जिल्ह्यातील माहुर येथील रहिवासी सुरेश दुधेशी झाला. मात्र, पतीच्या मृत्युनंतर जयश्रीला अन्नपाण्याविना अंधाऱ्या खोलीत वर्षभर डांबून ठेवण्यात आले. पश्चात तीला मरणासन्न अवस्थेत माहेरी सोडून सासरची मंडळी निघून गेली. अत्याचाराची परिसिमा गाठणारा हा घटनाक्रम जाणून घेतल्यानंतर २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावरही महिला किती परावलंबी आहेत,हे आ.ठाकूर यांनी सभागृह अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिला. महिला अत्याचारविरोधी कायदे अस्तित्वात आहेत, संरक्षण अधिकारी नियुक्त आहेत. मात्र, तरीही हे कायदे तकलादू ठरत असल्याचे मत आ.ठाकूर यांनी सभागृहात मांडले. त्यामुळे कायदे करून चालणार नाही तर त्यांची अमंलबजावणी कठोरपणे व्हावी, याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, असे त्यांनी सुचविले. सन २००४ व २००५ मधील महिलांविषयक कायद्यांमध्ये आमुलाग्र बदल व्हायला हवा, हा मुद्दा आ.ठाकूर यांनी मांडला. आज महिला- पुरुष बरोबरीने काम करीत असले तरी अत्याचार व छळाच्या बळी नेहमी महिलाचा का ठरतात? असा प्रश्न उपस्थित केला. कुंकवाचा धनी अचानक साथ सोडून गेल्यानंतर महिलांचा संपत्तीसाठी किंवा अन्य कारणांनी छळ केला जातो. ही बाब माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अत्याचारग्रस्त महिलांना फारशी मदत मिळत नसल्याची व्यथा आ.ठाकूर यांनी सभागृहात मांडली. या मुद्यावर सभागृह अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जयश्री दुधे प्रकरणी शासनाला योग्य ते निर्देश दिलेत. तसेच कायद्यात बदल करण्याविषयी आ.ठाकूर यांच्याकडून पत्र मागविले आहे. विदर्भातील एकमेव महिला आमदारविदर्भातून विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या यशोमती ठाकूर या एकमेव महिला आमदार आहेत. त्यामुळेच त्यांनी मांडलेल्या जयश्रीवरील अत्याचाराच्या मुद्याला आगळे महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या या लक्ष्यवेधीची सभागृहाने दखल घेतली. चौकशी करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिलेत.