शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आजपासून हॉटेल; लॉज, रेस्टॉरंटही सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:01 IST

‘मिशन बिगेन फेज-५’मध्ये महापालिका क्षेत्र व जिल्हा ग्रामीणमध्ये कंटेनमेंट झोन वगळून व विलगीकरणासाठी वापरात असलेल्यांना जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांच्या पुढील आदेशापर्य$ंत त्यांचा वापर सुरू ठेवावा लागणार आहे. या सर्व ठिकाणी प्रवेशद्वारालगत तसेच पार्किंगच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्या लागतील तसेच बसण्याच्या जागेची व्यवस्था करताना फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : ‘मिशन बिगेन फेज-५’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊन शिथिलतेनंतरही बंद असलेले हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस व रेस्टॉरंट आदी निवासी सुविधा असलेल्या आस्थापना अटी-शर्तींच्या निकषात बुधवारपासून सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठीची माहिती दर्शनी भागावर लावावी लागेल व निवासी असलेल्या अतिथींना रेस्टॉरंटमध्ये भोजनाची सुविधा राहणार आहे.‘मिशन बिगेन फेज-५’मध्ये महापालिका क्षेत्र व जिल्हा ग्रामीणमध्ये कंटेनमेंट झोन वगळून व विलगीकरणासाठी वापरात असलेल्यांना जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांच्या पुढील आदेशापर्य$ंत त्यांचा वापर सुरू ठेवावा लागणार आहे. या सर्व ठिकाणी प्रवेशद्वारालगत तसेच पार्किंगच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्या लागतील तसेच बसण्याच्या जागेची व्यवस्था करताना फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. प्रवेशाच्या ठिकाणी हँडवॉश, सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंग तसेच रिसेप्शन सेंटरच्या ठिकाणी संरक्षणात्मक काचेचा वापर करावा लागणार आहे. या सर्व ठिकाणी स्पर्र्श होणार नाही अशा डिजीटल पेमेंट, ई-वॉलेटचा वापर करावा लागणार आहे. एसी २४ ते ३० अंश तापमानात राहील, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.निवासी अतिथींनाच भोजनाची सुविधाभोजनाच्यावेळी अतिथी एकत्र नकोअतिथींच्या बैठक व्यवस्थेमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन हवे. भोजनाच्या वेळी ते एकत्र नको. जे अतिथी निवासी असतील, त्यांनाच जेवणाची सुविधा राहील, इतरांना नाही. गेमिंग आर्केड, लहान मुलांच्या खेळण्याची जागा, जलतरण तलाव, व्यायामशाळा बंद राहतील, असे आदेशात नमूद आहे.फक्त निरोगी व्यक्तींनाच प्रवेशया ठिकाणी फक्त निरोगी व्यक्तीं व जे चेहऱ्यावर मास्क परिधान करतील, अशा मोजक्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. निवासी राहणाऱ्या व्यक्तींचा प्रवास तपशील, वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे व या सर्वांना आरोग्य सेतु अ‍ॅपचा वापर बंधनकारक व रूम सर्व्हिसचा कमीत कमी वापर करावा लागणार आहे.आजारी झाल्यास त्वरित विलगीकरणया ठिकाणी कोणी आजारी व्यक्ती असल्यास त्यांचे तात्काळ विलगीकरण करून त्यांच्याकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. कुणालाही कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क करून संपूर्ण परिसर निर्जंतुक करावा लागेल.

टॅग्स :hotelहॉटेलcorona virusकोरोना वायरस बातम्या