शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आगीची घटना घडल्यासाठी रुग्णालय प्रशासन राहणार जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:13 IST

अमरावती : मागील काही काळात भंडारा, नागपूर, मुंबईसह काही भागांत शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये आग लागली होती. यातील बहुतांश ...

अमरावती : मागील काही काळात भंडारा, नागपूर, मुंबईसह काही भागांत शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये आग लागली होती. यातील बहुतांश घटना शॉर्टसर्किटमुळे घडल्याचे निष्पन्न झाले होते. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित रुग्णालयात प्रशासन जबाबदार धरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आला आग लागून बालकांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे नागपुरात येथील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांना प्राण गमवावा लागला. या आगी लागण्याचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे पुढे आल्याने रुग्णालयातील वीजपुरवठा यांच्यासंदर्भात अधिक काळजी, उपाययोजना करण्याचे निर्देश शासनाने शासकीय व खासगी रुग्णालयाच्या संचालकांना दिले आहेत. कोविड काळात रुग्णालयातील वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, जनित्र संच तसेच इन्व्हर्टरच्या माध्यमातून अंतर्गत वीजपुरवठा उपलब्ध करणे, ऑपरेशन थिएटर येथील वातानुकूलित यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विद्युत उपकरणांची निगा व देखभाल योग्य रीतीने करण्याच्या संदर्भात रुग्णालयांना शासनाने दिशानिर्देश दिले आहेत. रुग्णालयात अंतर्गत वीज संच मांडणीच्या सुरक्षित यासोबतच वीजपुरवठ्याची अखंडता तेवढीच महत्त्वाची आहे. अखंडित वीजपुरवठा राखण्याची रुग्णालय प्रशासन, तसेच पुरवठादार कंपनीची सामूहिक जबाबदारी राहणार आहे.

बॉक्स

या निकषांचे पालन आवश्यक

विजेच्या उच्च व मध्यम अदा फिल्टरची नियतकालिक पेट्रोलिंग व पाहणी करणे.

रुग्णालयातील वीज बार मंजूर बारापेक्षा अधिक राहणार नाही याची तपासणी करणे.

केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम २०१० नुसार वीज संच मांडणी राखणे.

तसेच पंधरा मीटरपेक्षा उंच इमारतीतील रुग्णालयांनी वीज संच बांधण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेणे.

सक्षम संस्थेमार्फत फायर ऑडिट नियमितपणे करून अग्निशमन यंत्रणा लावणे.

बॉक्स

रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य

कोरोना काळात शासकीय व खासगी रुग्णालयांवर बराच ताण होता. त्याचप्रमाणे वीज उपकरणांची निगा व देखभाल योग्य रीतीने न राखल्याने या अनुचित घटना घडल्या आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयातील वीजपुरवठा योग्य राहावा, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या जीवन सुरक्षेला प्राधान्य राहावे या उद्देशाने शासनाने हे निर्देश जारी केल्याचे सूत्रांनी सांगितले.