शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने कोंबड्या केल्या फस्त

By admin | Updated: July 11, 2017 00:11 IST

बिबट्याच्या एका दोन वर्षीय बछड्याने शेतशिवारात शिरून कोंबड्या फस्त केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. वनाधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

पोहरा शेतशिवारातील घटना : वनाधिकाऱ्यांनी केला पंचनामालोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : बिबट्याच्या एका दोन वर्षीय बछड्याने शेतशिवारात शिरून कोंबड्या फस्त केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. वनाधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. त्याचे झाले असे की, पोहरा शिवारात प्रेमसिंग पवार यांचे शेत असून शेताला लागून चिरोडीचे वनक्षेत्र आहे. शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय म्हणून जाळीचे कम्पाऊंड करून त्यात गावरानी कोंबड्यांना राहण्याची सुविधा केली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याचा छावा शेतशिवारात शिरला. जाळीच्या कम्पाऊंडमध्ये शिरून झोपडीवजा खुराड्यात घुसला आणि कोंबड्या फस्त केल्यात. सकाळी शेती मालक वनधिकारी विनोद कोहळे यांना भेटून घटनेची माहिती दिली असता वनरक्षक एन.जी. नेतनवार, पी.बी. शेंडे, आर.के. खडसे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. दरम्यान बिबट्याचे पगमार्क आढळून आले. घटनास्थळावर एक कोंबडी मृत आढळून आली. जाळीच्या कुंपणात कोंबड्यांचे पंख आणि पाय दिसून आले. शेतीच्या धुऱ्यावर दोन कोंबड्यांचे मांस व आतड्या आढळून आल्या. त्याठिकाणी पंख आढळून आले. घटनास्थळी केवळ एक कोंबडी मृत आढळून आली. दोन कोंबड्याचे मांस आढळून आल्याने बिबट्याच्या बछड्याने कोंबड्या ठार मारल्याचे पृष्ठी वनाधिकाऱ्यांनी केली आहे. परंतु शेतकऱ्यांनी ४० च्या आसपास कोंबड्या बिबट्याने ठार मारल्याचे सांगितले. आतापर्यंत बिबट माणसाला, जनारास ठार मारल्याची घटना उघडकीस आली. कोंबडीने वाचविले स्वत:चे प्राण बिबट्याने मध्यरात्री खुराड्यात प्रवेश केला तेव्हा उंचावर टोपलीत एक कोंबडी अंडी उबवित होती. खुराड्यात आरडाओरड सुरू असताना त्या टोपलीतील कोंबडीने खाली उडी न घेता निपचित टोपलीतच बसली राहिली, त्यामुळे तिचे प्राण वाचले.