शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

हुक्का पार्लर अवैध? सीपींचा मनाई हुकूम

By admin | Updated: May 11, 2017 00:02 IST

आवश्यक त्या सर्वच परवानगी असल्याची बतावणी करणाऱ्या "अड्डा २७" या हुक्का पार्लरची बनवेगिरी उघड झाली आहे.

‘टोबॅको स्मोकिंग’चा परवाना : सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला पोलिसांचे पत्रलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आवश्यक त्या सर्वच परवानगी असल्याची बतावणी करणाऱ्या "अड्डा २७" या हुक्का पार्लरची बनवेगिरी उघड झाली आहे. महापालिका, अन्न व औषधी प्रशासनाची परवानगी हुक्का पार्लरला नसल्याच्या माहितीवर अमरावती शहर पोलिसांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले. अमरावतीच्या शालिन संस्कृतीला विद्रुप करू पाहणाऱ्या रेल्वेस्थानक ते बसस्थानक रस्त्यावरील ‘अड्डा-२७’ या हुक्का पार्लरला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी मनाईहुकूम बजावला. तपासकार्य निर्णायक वळणावर पोहोचेपर्यंत या आदेशानुसार ‘अड्डा २७’ बंद ठेवणे अपेक्षित आहे. पोलीस आयुक्त मंडलिक यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हुक्का पार्लरला नेमक्या कुठल्या परवानगी आहेत, कुठल्या अधिकाऱ्यांनी ती परवानगी बहाल केली आणि प्राप्त परवानगीच्या अर्टी व शर्ती काय, याबाबत अभ्यास करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहेत. ‘अड्डा २७’ च्या संचालकाकडे महापालिका आणि अन्न व औषधी प्रशासन खात्याच्या परवानगी नाहीत. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचीच कुठलीशी परवानगी ‘अड्डा २७’कडे आहे, ही माहिती पोलिसांच्या तपास पथकाला प्राप्त झाल्यावर ती परवानगी नेमकी कशासाठी? यासंबंधाने सीपींनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयास पत्र पाठविले आहे. उत्तर आल्यावर नेमकी स्थिती स्पष्ट होईल. अवैध प्रकारांचा संशयसोमवारी रात्री सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र गायकवाड यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या नेतृत्वात पोलिसांनी बॉम्बे स्ट्रीट कॅफेवरील ‘अड्डा-२७’ ची झडती घेतली. ‘अड्डा -२७’ मध्ये हुक्का पार्लर आढळले. त्या ठिकाणी तरुण मुले-मुली होते. पोलिसांना तेथे हुक्का पार्लरच्या नावाखाली अवैध प्रकार होत असल्याचा संशय आहे. ‘अड्डा-२७’ बंद ठेवण्याचा आदेश त्यामुळेच देण्यात आला आहे. तंबाखू धुम्रपान झोन‘लोकमत’ने सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांच्याशी संपर्क साधला असता शहरात ३० ते ४० हजार शॉप अ‍ॅक्ट परवाने त्यांच्या कार्यालयातून वितरित झाले. आपण सांगता अशा प्रकारासाठीचा परवाना दिल्याचे माझ्या स्मरणात नाही; तथापि गुरुवारी परवानाधारकांची कागदपत्रे तपासून याविषयी नेमकेपणाने बोलता येईल, असे ते म्हणाले. पोलिसांनी ‘अड्डा-२७’ च्या संचालकाकडून प्राप्त केलेल्या कागदपत्रांत केवळ सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचा ‘शॉप अ‍ॅक्ट’ परवाना आढळून आला आहे. त्यावर ’टोबॅको स्मोकिंग झोन’चा उल्लेख आहे. अमरावतीच्या संस्कृतीसाठी बजरंग दलाचा पुढाकारअमरावती शहराची संस्कृती जपण्यासाठी बजरंग दलाचे महानगर संयोजक निरजंन दुबे यांनी पुढाकार घेतला आहे. हुक्का पार्लरसारखे सामाजिकदृष्ट्या अरुचिपूर्ण असलेले प्रकार बंद करण्यासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते गुरुवारी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत. हुक्का पार्लरला पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोप त्यांनी केला. तेथे डान्सबार सुरू असल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे. महापालिका आयुक्त कुणाची करणार पाठराखण ?महापालिकेने हुक्का संस्कृतीला परवानगीकृत केले नसले तरी या घडामोडींदरम्यान हुक्का पार्लरचे नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मंगळवारी एक अर्ज महापालिकेत ‘इनवर्ड’ झाला आहे. हा अर्ज कुणाचा, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे. महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार हे हुक्का पार्लर चालविण्यास परवानगी देतात की, अमरावतीच्या सभ्य संस्कृतीची पाठराखण करतात, हे कळलेच. ‘अड्डा-२७’ कडे असलेल्या परवान्याला आधार काय, परवानगी नेमकी कशाची, या बाबी पडताळून पाहण्यासाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला पत्र पाठविले आहे. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.