शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

सेवाज्येष्ठता यादीवरून ‘नाराजीनाट्य’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:15 IST

महापालिकेतील रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी केलेल्या आवाहनास साद देऊन ७० पेक्षा अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे पदोन्नतीचे प्रस्ताव दिले आहेत. त्यासंदर्भात तीन दिवसांपूर्वी निवड समितीची बैठकही पार पडली. मात्र, सेवाज्येष्ठता यादीतील घोळ निस्तरता न आल्याने त्या संभाव्य पदोन्नती व जम्पिंग प्रमोशनवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

ठळक मुद्देथेट पदोन्नतीवर आक्षेप : अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ‘जीएडी’वर शाब्दिक हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेतील रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी केलेल्या आवाहनास साद देऊन ७० पेक्षा अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे पदोन्नतीचे प्रस्ताव दिले आहेत. त्यासंदर्भात तीन दिवसांपूर्वी निवड समितीची बैठकही पार पडली. मात्र, सेवाज्येष्ठता यादीतील घोळ निस्तरता न आल्याने त्या संभाव्य पदोन्नती व जम्पिंग प्रमोशनवर प्रश्नचिन्ह लागले आहे.महापालिकतील रिक्त पदांची वाढलेल्या संख्येमुळे एका अधिकारी कर्मचाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक पदांचा पदभार देण्यात आला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेला रिक्त पदांचा अनुशेष, मनुष्यबळाअभावी निर्माण झालेल्या प्रशासकीय अडचणी लक्षात घेता महापालिकेतील सेवा प्रवेश नियमानुसार, विशेष शैक्षणिक अर्हतेची आवश्यकता असणारी पदे उपलब्ध अधिकारी कर्मचाऱ्यांमधून भरण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला. त्याअनुषंगाने विषयांकित नियुक्तीसंदर्भात महापालिकेतील पात्र आणि इच्छुक अधिकारी, कर्मचारी वंचित राहू नये, यासाठी त्यांचेकडून संपूर्ण माहिती मागविण्यात आली. तसेच ज्या पदावर पदोन्नतीने नियुक्ती होऊ शकत नाही, अशा पदांवरही आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांमधून नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यानुसार, सामान्य प्रशासन विभागाकडे उपायुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, अधीक्षक, क्रिडाधिकारी, नगरसचिव, समुदाय विकास अधिकारी, लेखाधिकारी व अन्य काही पदांसाठी ७० अर्ज प्राप्त झाले. मात्र, कुठलीही पदोन्नती वा ‘वन स्टेप प्रमोशन’साठी सेवाज्येष्टतेला महत्त्व आहे. दोन कर्मचारी एकाच दिवशी नौकरीस लागले असतील तरीही त्यांची नियुक्तीची वेळ, जात, समांतर आरक्षण, शिक्षण, जन्मतारीख व अन्य काही घटकांवरून सेवतील ज्येष्ठता निश्चित केली जाते. त्यासाठी शासननिर्णय जारी करण्यात आले. मात्र महापालिकेत या सेवाज्येष्टता यादीचा घोळ दहा वर्षापासून निस्तरता आलेला नाही. दोन कर्मचाºयांनी सेवाज्येष्टतेला आव्हान देऊन न्यायालयात धाव घेतली. आता नव्याने प्रशासनाने काही जणांना पदोन्न्नत करण्याचा निर्णय घेतल्याने इच्छुकांत खळबळ माजली असून, त्याच्यापेक्षा आपणच सेवाज्येष्ठ असा दावा अनेकांमधून केला जात आहे.महापालिकेत ८२७ पदे रिक्तजुन्या आकृतीबंधानुसार, महापालिकेत तुर्तास वर्ग १ व वर्ग २ चे प्रत्येकी १३, वर्ग ३चे ४३० व वर्ग ४ चे ११३२ क र्मचारी कार्यरत आहेत. एकूण २४१५ मंजूर पदांपैकी १५८८ जण कार्यरत असून ८२७ पदे रिक्त आहेत. कार्यरत पदांची सेवाज्येष्टता तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाकडून केले जाते. तीन वर्र्षापुर्वी ती यादी तयार करण्यात आली.त्यावर आक्षेप मागविण्यात आले.अद्यापही त्या आक्षेपांचे निराकरण करण्यात आले नाही. अनेकांनी त्या प्राथमिक यादीवर आक्षेप घेतलेत.त्यांची पदोन्नती वैध कशी ?सुधारित आकृतीबंध व सेवाप्रवेश नियमांना शासन मान्यता मिळाली नसताना महापालिका अधिकारी कर्मचाºयांकडून पदोन्नतीसाठीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सदोष सेवाज्येष्टता यादीमुळे पदोन्नती रखडल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष माजला आहे. त्या सदोष यादीप्रमाणे झालेल्या पदोन्नतीला दोन कर्मचाºयांनी न्यायालयात आव्हान दिले असून आणखी काही कर्मचारी न्यायालयात दाद मागण्याच्या मानसिकतेपर्यंत पोहोचले आहेत. अनंत पोतदार आणि मदन तांबेकर यांना सेवानिवृतीच्या पंधरा दिवसांपूर्वी पदोन्नती केल्याच्या पार्श्वभूमीवर या असंतोषात भर पडली आहे.