पोटे यांचे प्रतिपादन : ४२ व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटनअमरावती : शेतकऱ्यांना जीवन जगताना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यातुलनेत आपले जीवन अत्यंत सुुखदायी आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांसाठी प्रामाणिक काम केल्याचे समाधान काही वेगळेच असते, असे प्रतिपादन राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी अधिवेशनादरम्यान केले. सबॉर्डिनेट इंजिनीअर्स असोशियनच्यावतीने शनिवारी संत सांस्कृतिक भवनातील आयोजित ४२ वे वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष दर्यापूरचे आ. रमेश बुंदिले, मुख्य अंभियता संजय ताकसांडे, महापौर चरणजीत कौर नंदा, ए.आय.पी.ई.एफ.चे अध्यक्ष शैलेंद्र दुबे, रत्नाकर राव, रामेश्वर माहुरे, सुनील जगताप, सुनील देशमुख, विलास पवार, गजानन गोदे, उज्ज्वल गावंडे, साईश खारकर, राजाराम शितोंळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. विश्वश्वरय्या यांच्या प्रतीमेला हारार्पण करुन दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. उद्घाटनादरम्यान ना. पोटे भावूक झाले होते. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत त्यांनी अंभियत्यांना प्रामाणिक काम करण्याचा सल्ला दिला. आपण आपल्या घरी विद्युत जोडणी घेतल्यावर सर्व प्रकारची काळजी घेतो, त्या प्रमाणे महावितरणाच्या माध्यमातून नागरिकांनाही प्रामाणिक सेवा पुरविली पाहिजे, त्या कामाचे समाधान वेगळेच असते, असे पोटे म्हणाले. संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर माहुरे यांनी ईन्फ्रा-२ योजनेबद्दल माहिती देताना सांगितले की, ईन्फ्रा-२ योजनेतील कामे लवकरात लवकर केल्यास ओव्हरलोडींगचा प्रश्न निकाली निघून ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण कमी होईल व शेतकऱ्यांना योग्यरितीने वीज पुरवठा मिळण्यास सोपे जाईल. महावितरण कंपनीने स्वतचे डिझाईननुसार विजेचे मिटर घेतल्यास वीज चोरीवरही नियंत्रण मिळू शकेल. महापौर रिना नंदा यांनीही आपल्या भाषणातून विद्युत महावितरणाच्या कामांचे कौतूक करुन त्यांना योग्य सेवा पुरविण्याची विनंती केली. आ. रमेश बुंदिले यांनी शेतकऱ्यांना २४ तास वीज कशी देता येईल याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्तविक गजानन गोदे, संचालन क्षिप्रा मानकर तर आभार उज्ज्वल गावंडे यांनी केले. यावेळी राजेंद्र ठाकरे, देवीदास तिडके, बिपीन श्रीराव, यांच्यासह महाराष्टभरातील हजारो अंभियते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रामाणिक कामाचे समाधान वेगळेच
By admin | Updated: January 24, 2015 22:46 IST