शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल रंगोली पर्लच्या वॉलकंपाऊंडवर हातोडा

By admin | Updated: September 27, 2015 00:05 IST

बडनेरा मार्गालगतच्या हॉटेल रंगोली पर्लद्वारा सार्वजनिक रस्त्यावर अनाधिकृत बांधकाम केलेले वॉलकम्पाऊंड शनिवारी सकाळी ६ वाजता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारा पाडण्यात आले.

महापालिकेची कारवाई : उर्वरित अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीसअमरावती : बडनेरा मार्गालगतच्या हॉटेल रंगोली पर्लद्वारा सार्वजनिक रस्त्यावर अनाधिकृत बांधकाम केलेले वॉलकम्पाऊंड शनिवारी सकाळी ६ वाजता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारा पाडण्यात आले. महापालिकेच्या या कारवाईमुळे हॉटेलच्या संचालक तथा नगरसेवकास ‘अनर्ह’ का ठरविण्यात येऊ नये, अशी नोटीस आयुक्तांनी बजावून १५ दिवसांत खुलासा मागविला आहे.हॉटेल रंगोली पर्लचे रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी संचालकांनी दोन दिवसांचा अवधी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिला होता. संचालकांनी स्वत: अतिक्रमण काढले नाही तर ते शनिवारी काढले जाईल, असा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. महापालिका क्षेत्रातील सर्व्हे नं.६७, भूखंड क्रमांक ८/४ रंगोली टॉवर येथे मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनाधिकृत बांधकाम होते.आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाईअमरावती : बांधकामापैकी रस्त्यावर अतिक्रमण असलेले वॉलकम्पाऊंड शनिवारी सकाळी जमीनदोस्त करण्यात आले. आयुक्त गुडेवार यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता पोतदार, सहायक अभियंता दीपक खंडेकर, अतिक्रमण पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, शाखा अभियंता घनश्याम वाघाडे. शाखा अभियंता मंगेश कडू, मनीष हिरोडे, उमेश सवाई, प्रितम रामटेके, पोलीस निरीक्षक खराते यांनी तीन जेसीबी व दोन ट्रक तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांनी ही कारवाई केली.असे आहे अनधिकृत बांधकामहॉटेल रंगोली पर्लमध्ये तळघर ६७३ चौरस मीटर, तळमजला २२७, पहिला मजला १४७, दुसरा मजला १५८, तिसरा मजला १५४, चौथा मजला १५४, पाचवा मजल्यावर १२५ चौरस मिटर बांधकाम अनाधिकृत असल्याने १५ दिवसांचे आत बांधकाम पाडावे. अन्यथा महापालिका कारवाई करेल, अशी नोटीस महापालिकेच्या दक्षिण झोन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्तांनी हॉटेलच्या संचालकाला शनिवारी बजावली आहे. -तर अपात्रतेची कारवाईमहाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम १० (१ ड) नुसार पालिका सदस्याने या अधिनियमाच्या किंवा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अन्वये तरतुदीचा भंग करून कोणतेही बेकायदेशीर किंवा अनधिकृत संरचनात्मक बांधकाम केले असेल किंवा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असेल किंवा अतिक्रमित बांधकाम पाडीत असताना शासकीय कर्तव्यावरील सक्षम प्राधिकाऱ्यास लेखी पत्र देऊन अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असेल तर असा पालिका सदस्य म्हणून राहण्यास अनर्ह ठरेल, असे प्रावधान आहे. असा संदर्भ देऊन हॉटेल संचालक देशमुख यांना आपणास कलम १० (१ ड) नुसार अनर्ह का करण्यात येऊ नये, अशी नोटीस आयुक्त गुडेवार यांनी बजावून १५ दिवसांत खुलासा मागविला आहे. भूमिअभिलेख विभागाच्या मोजमापाविना महापालिकेने हॉटेलची वॉल कंपाऊंड तोडले. मला विचार करण्यासाठी वेळ दिला नाही. मला पूर्णपणे अंधारात ठेवून महापालिकेने ही कारवाई केलेली आहे. सदर कारवाई अयोग्य आहे. त्यामुळे मी याचा निषेध करतो.- नितीन देशमुख, संचालक, हॉटेल रंगोली पर्ल.