शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

घरविक्रीसाठी गृहनिर्माणचे बनावट लेटरहेड

By admin | Updated: February 2, 2017 00:10 IST

संताजीनगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.चे बनावट लेटरहेड तयार करून घरविक्रीसाठी नाहरकत प्रमाणपत्र तयार केल्याची तक्रार ...

गुन्हे नोंदविण्यास विलंब : संस्था पदाधिकाऱ्यांसह वृद्ध जोडप्याची तक्रार अमरावती : संताजीनगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.चे बनावट लेटरहेड तयार करून घरविक्रीसाठी नाहरकत प्रमाणपत्र तयार केल्याची तक्रार संस्था पदाधिकाऱ्यांसह एका वृद्ध दाम्पत्याने राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली. मात्र, याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून विलंब केला जात असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. गृहनिर्माण संस्थेचे सचिव कृष्ण नारायण गुल्हाने (६५,रा. संताजीनगर) यांनी २७ जानेवारी रोजी संस्था सदस्य कीर्ती गणेश मांडवे यांच्याविरूद्ध तक्रार नोंदविली आहे. तक्रारीनुसार कीर्ती मांडवे यांनी संस्थेचे बनावट लेटरहेड तयार करून त्यावर बनावट नाहरकत प्रमाणपत्र तयार केले. त्यावर संस्थेचे सचिव कृ.ना. गुल्हाने यांची बनावट सहीसुद्धा केली. तसेच संस्थेच्या नावाचे बनावट शिक्के तयार केले. याबनावटी दस्तऐवजांचा वापर करून मांडवे यांनी त्यांच्या घराची विक्री व हस्तांतरण करण्यासाठी दुरूपयोग केला. अशा बनावटी दस्तऐवजांद्वारे मांडवे यांनी अनेकांची फसवणूक करून लाखो रुपये घेतल्याचा आरोप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारीतून केला आहे. याप्रकारच्या फसवणुकीचे एक प्रकरण न्यायप्रविष्ट असून संस्थेमार्फत कीर्ती मांडवेंना कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र देण्यात न आल्याचे सचिव गुल्हाने यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे. संस्थेने नाहरकत प्रमाणपत्र द्यावेत, याबाबत कीर्ती मांडवे व त्यांचे साथीदार राजेश शिरभाते यांनी दबाव आणत असल्याचा आरोपही सचिव गुल्हाने यांनी केला आहे. त्यापूर्वी शामनगरातील वृद्ध दाम्पत्य गायकवाड यांनीही कीर्ती मांडवेविरूद्ध २४ जानेवारीला तक्रार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार मांडवे यांनी गायकवाड यांच्याशी घरविक्रीचा सौदा केला होता. त्यांनाही संस्थेच्या नावे असणारे बनावट लेटरहेड देऊन त्यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे कीर्ती मांडवेविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, जेणे करून आणखी कोणाची फसवणूक होऊ नये, अशी मागणी संस्था पदाधिकाऱ्यांसह गायकवाड दाम्पत्याने राजापेठ पोलिसांकडे केली आहे. यातक्रारीच्या अनुषंगाने कीर्ती मांडवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. संस्था पदाधिकारी व गायकवाड दाम्पत्याने महिलेविरोधात तक्रार अर्ज दिला आहे. त्याअनुषंगाने चौकशी सुरु केली आहे. याचप्रकरणाशी संबंधित धनादेश अनादरणाची केस न्यायालयात सुरु आहे. चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येईल. किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ पोलीस ठाणे.