शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

१ जूनपासून घर मोजणी अभियान

By admin | Updated: May 31, 2015 00:19 IST

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी १ जूनपासून शहरात घरमोजणी अभियान सुरु होत आहे. यात नवीन,

आदेश : तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ४०० विद्यार्थ्यांची नियुक्तीअमरावती : महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी १ जूनपासून शहरात घरमोजणी अभियान सुरु होत आहे. यात नवीन, जुन्या घरांची मोजणी करुन मालमत्ता कर आकारणी केली जाणार आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार हे अभियान राबविले जात आहे.गेल्या २० वर्षांपासून मालमत्तांचे करमूल्य निर्धारण करण्यात आले नाही. शहरात घरांची संख्या वाढली असताना प्रशासनाकडे केवळ दीड लाख मालमत्ता असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मालमत्तांची आकडेवारी ही अडीच लाखांच्या घरात पोहोचल्याचा अंदाज आयुक्तांचा आहे. शहराची लोकसंख्या साडेआठ लाख असताना करातून येणारे उत्पन्न फारच कमी असल्याच्या निष्कर्षाप्रत आयुक्त गुडेवार पोहोचले आहेत. परंतु कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने तांत्रिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची घर मोजणीसाठी निवड केली आहे. संबंधित शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापकांशी चर्चा करुन मानधन देण्याच्या अटीवर या विद्यार्थ्यांची घर मोजणीसाठी निवड करणात आली आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी घर मोजणी अभियान यशस्वीपणे राबविता यावे, यासाठी विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिक पार पडले आहे. हल्ली महापालिकेला मालमत्ताकरातून दरवर्षी ४० कोटी अपेक्षित आहेत. मात्र, या करातून २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त प्राप्ती होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. उत्पन्नात घसरण झाल्याने महापालिकेचा कारभार कसा चालवावा?, हा सवाल अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. परिणामी आयुक्तांनी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणाऱ्यावर भर देण्याचे ठरविले आहे. या श्रृखंलेत घर मोजणी अभियानाचा पहिला टप्पा सोमवारपासून प्रारंभ केला जात आहे. एका लिपिकाकडे तीन गु्रप घर मोजणी अभियानात एका कर वसुली लिपिकाकडे तीन विद्यार्थ्यांचे गु्रप देण्याची तयारी आहे. या मोजणीमध्ये दोन मुलांचा एक ग्रुप राहिल. प्रत्यक्ष मोजणीनंतर हा डेटा करवसुली लिपिकाकडे सादर केला जाईल. करवाढीवर भर देण्यासाठीच हे अभियान सुरु होत असल्याचे सांगितले जात आहे. ४०० विद्यार्थ्यांची चमू शहारातील घरे मोजणार आहे. प्राचार्यांच्या स्वाक्षरीचे ओळखपत्र या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.हे अभियान घर मोजणीसाठी आहे. अवैध बांधकाम पाडणे किंवा अतिरिक्त बांधकाम पाडणे त्यासाठी नाही. नवीन, जुने घर तपासताना कर आकारण्यात आला अथवा नाही, याची शोधमोहिम सुरु होत आहे. घरांवर कर आकारणी करणे सुकर होईल.-महेश देशमुख, मूल्य निर्धारण,कर निर्धारण अधिकारी