शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील पिंपळोद गावात ६९ वर्षांपासून होळीचे आयोजन नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 12:21 IST

धूडवळीची सर्वत्र वाट पाहिली जात असताना येवदा तालुक्यातील पिंपळोद येथे मात्र गेल्या ६९ वर्षांपासून होळीचे आयोजन होत नाही

ठळक मुद्देपरशराम महाराजांच्या सन्मानार्थ शोभायात्रा

अनंत बोबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: धूडवळीची सर्वत्र वाट पाहिली जात असताना येवदा तालुक्यातील पिंपळोद येथे मात्र गेल्या ६९ वर्षांपासून होळीचे आयोजन होत नाही, तर येथील ग्रामस्थ परमहंस परशराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार, शुक्रवारी होत असलेल्या कार्यक्रमांच्या आयोजनात गुंतले आहेत.पिंपळोद या गावाला संत परमहंस परशराम महाराज यांचा पावनस्पर्श लाभला आहे. महाराजांची ख्याती कर्णोपकर्णी सर्वदूर पसरल्याने त्यांच्या भक्तपरिवारात मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग होता. १९५१ मधील वैशाख पौर्णिमेला महाराज वैकुंठवासी झाले. तेव्हापासून या गावात होळी पेटत नाही, रंगांची उधळण होत नाही. मात्र, यानिमित्त गावात स्वच्छता अभियान राबविले जाते. सर्व गाव स्वच्छ करून केरकचरा नाहीसा केला जातो. होळी न पेटविल्यामुळे झाडांची कत्तल होत नाही तसेच रंगांची उधळण होत नसल्यामुळे शारीरिक हानीसुद्धा होत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याचा संदेश हे गाव देत आहे.गावातील परशरामनगर येथे यानिमित्त गुरुवार, १ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता हभप उद्धवराव गाडेकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार, २ मार्च रोजी सकाळी १० वाजता दिंड्या-पताक्यांच्या हजेरीत महाराजांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता हभप दासगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल. यानिमित्त परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभणार आहे. दरम्यान, होळीचा सण साजरा न करता परशराम महाराज पुण्यतिथी सोहळ्यासाठी गावातील आबालवृद्ध झटत आहेत.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८colourरंग