शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफ ीच्या अध्यादेशाची होळी

By admin | Updated: June 22, 2017 00:03 IST

कर्जमाफीला तत्वत: व निकषांच्या आधारे मान्यता, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

काँग्रेसचे आंदोलन : चांदूरबाजार, तिवसा, अंजनगाव व दर्यापुरात कार्यकर्ते एकवटले अमरावती : कर्जमाफीला तत्वत: व निकषांच्या आधारे मान्यता, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसा अध्यादेश शासनाने काढला आहे. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून सरकारने कर्जमाफ ीचा केवळ ‘फ ार्स’ चालविल्याचा आरोप करीत काँग्रेसने तिवसा, चांदूरबाजार, दर्यापूर व अंजनगावात बुधवारी आंदोलन केले. कर्जमाफीचा जीआर जाळून शासन निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. तिवसा : तालुका काँग्रेसच्यावतीने तहसील प्रशासकीय इमारत परिसरात आंदोलन करून शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. भाजप शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शासनविरोधी घोषणा दिल्यात. बँकेने अद्याप शेतकऱ्यांना पीककर्ज दिलेले नाही. सुकाणू समितीच्या बैठकी सुरूच आहेत. शेतकरी संप थांबावा, यासाठी केवळ घोषणाबाजी केली जात असल्याचा आरोप यावेळी केला. तिवसा येथे नाफेडमार्फत अनेक शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले असून तूर खरेदी झालेली नाही. अनेक शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत, असा आरोपही करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मुकुंद देशमुख, दिलीप काळबांडे, वैभव वानखडे, सागर राऊत, रामदास मेहत्रे, नरेंद्र विघ्ने, दीपक पावडे, उपस्थित होते.चांदूरबाजार : येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शासनाने कर्जमाफी व तत्काळ दहा हजार रूपये देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, या निर्णयातील अटी व निकषांमुळे सर्वसाधारण व गरीब शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासननिर्णयाचा विरोध करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करण्यात आली. सोबतच एक निषेध निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी बाजार समिती सभापती अरविंद लंगोटे, शिवाजी बंड, किशोर देशमुख, बाबूभाई इनामदार, बाबूराव जवंजाळ, छोटू देशमुख, विलास गांजरे, भय्या काळे, विशाल बेले, प्रवीण वाघमारे, नंदू भोयर,संजय म्हाला, प्रमोद घुलक्षे नजीम बेग, भाई देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.दर्यापूर : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार अमोल कुंभार यांना शासनाच्या अध्यादेशाचे निवेदन देत तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, अभिजीत देवके, सुनील गावंडे बबनराव देशमुख, शशांक धर्माळे, साहेबराव बदे, राजिकभाई, राजू वानखडे, अविनाश ठाकरे, केशव भडांगे, दिलीप चव्हाण उपस्थित होते.अंजनगाव सुर्जी : येथील तहसील कार्यालयासमोर तालुकाध्यक्ष राजेंद्र आडे यांच्या नेतृत्वात शासनाच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. हरिभाऊ बहिरे, सत्यविजय निपाने, हिम्मत ढोक, विनोद देशमुख, मुरलीधर तुरखडे, सुभाष चौखंडे, ज्ञानेश्वर मुरतकर, दिलीप देशमुख, रवि बोंदरे, फरहाज भाई, एकनाथ निचळ, नितीन निमकाळे, प्रफु ल्ल ढोक, दीपक हरणे, राहुल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.