शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकरीविरोधी कायद्यांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:10 IST

जिल्हा काँग्रेसचे आंदोलन; मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी अमरावती : जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने १९ जून रोजी खासदार राहुल गांधी यांच्या ...

जिल्हा काँग्रेसचे आंदोलन; मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

अमरावती : जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने १९ जून रोजी खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरीविरोधी केंद्रीय कृषी कायद्यांची होळी करण्यात आली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या आंदोलनात मोदी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

केंद्रातील भाजप सरकारने घेतलेल्या अनेक तुघलकी निर्णयांमुळे देशातील जनता भरडली जात असून, महागाईने गरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. एकीकडे देशात प्रचंड अराजकता माजली आहे, तर जगभरात बदनामी झाली. या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी खा. राहुल गांधी यांच्या विचारांची व दूरदृष्टीची गरज असल्याचे मत बबलू देशमुख यांनी यावेळी शेतकरी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.

देशातील लाखो युवक मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे बेरोजगार झाले आहेत. देशातील महागाई वाढत आहे. अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले आहे. अनेक वेळा खा. राहुल गांधी यांनी मोदी सरकारला पत्र लिहून उपाययोजना सुचविल्या, पण केंद्राने त्या अव्हेरल्या, असेही बबलू देशमुख यांनी सांगितले. याप्रसंगी आ. बळवंत वानखडे यांनीही आंदोलकांना संबोधित केले.

एक देश - एक बाजारपेठ, करार शेती व्यवसाय, जीवनावश्यक वस्तू सुधारणा या २०२० मधील तिन्ही कायद्यांच्या प्रपत्राची होळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी शेतकर्‍यांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘माझी मशाल माझा दणका - जाळी या मोदीच्या पापाची लंका’ असे नारे दिले. आंदोलनात बाळा साहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे, दयाराम काळे, जयंत देशमुख, प्रदीप देशमुख, छाया दंडाळे, महेंद्र गैलवार, हरीभाऊ मोहोड, संजय लायदे, परीक्षित जगताप, किशोर देशमुख, सिद्धार्थ बोबडे, श्रीकांत झोडपे, सतीश धोंडे, अरविंद लंगोटे, बाबूराव जवंजाळ, अरुण दाते, श्रीकृष्ण सरदार, विशाल भट्टड, रवींद्र खवले, नीरज कोकाटे, अब्दुल नईम, शशांक श्रीराव, सलामुद्दीन उर्फ सल्लू,भागवत खांडे, समाधान दहातोंडे, मोहन सिंगवी, बबलू इनामदार, वीरेंद्र जाधव, किशोर खडसे, रत्नाकर करुले, मुमताज देशमुख, दिलीप डाखोरे, शिवाजी देशमुख, राजेंद्र नागपुरे, संजय बेलोकर, अमोल देशमुख, पंकज वानखडे, राजू कुरेशी उपस्थित होते.