शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या आवारात हॉकी स्टिक अन् दंडुके!

By प्रदीप भाकरे | Updated: June 26, 2024 13:40 IST

स्वच्छता कंत्राटदारांनी बिलासाठी घातला राडा : प्रलंबित बिलावरून घोषणाबाजी, दंग्याचा गुन्हा

अमरावती: महापालिकेच्या आवारात हॉकी स्टिक व दंडुके हाती घेऊन दंगा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन स्वच्छता कंत्राटदारांसह त्यांच्या आठ ते दहा सहकाऱ्यांविरूध्द सिटी कोतवाली पोलिसांनी २५ जून रोजी रात्री बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला. २५ जून रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास महानगरपालिका आवारात ती घटना घडली होती. याबाबत सिटी कोतवालीतील पोलीस उपनिरिक्षक अजय जाधव यांनी सुमोटो तक्रार नोंदविली.

             

पोलीस उपनिरिक्षक अजय जाधव हे सिटी कोतवालीत कार्यरत असताना त्यांना राजकमल चौकस्थित महापालिका आवारात काही लोक हातात हॉकी स्टिक आणि दंडुके घेऊन एकत्र आल्याची माहिती मिळाली. त्यावर ते पीएसआय रामप्रताप यादव, हवालदार दिपक श्रीवास्तव, प्रशांत बोंडे, मंगेश दिघेकर यांच्यासह सकाळी ११.४५ च्या सुमारास महापालिका आवारात पोहोचले. त्यावेळी त्यांना आठ ते दहा लोकांचा जमाव दिसून आला. पीएसआय जाधव यांनी त्यांना विचारणा केली असता, ठेकेदार संजय माहुरकर व विजय मलिक यांचे बिल पास होत नसल्याने आम्ही त्यांच्यासोबत आलो आहे, असे त्यांनी सांगितले. जमावातील काही लोकांकडे हॉकी स्टिक व दंडुके दिसत असल्याने तो जमाव दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने आणि तयारीने दिसत असल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरोपींना टोकले.

 

दोन दिवसांपुर्वी फ्री स्टाईलजमावातील लोकांनी पोलिसांच्या आदेशाचा प्रतिकार करीत विरोध केला. ठेकेदार संजय माहुरकर व विजय मलिक यांचे बिल कसे पास होत नाही, अशा घोषणा करत त्यांनी दंगा केला. त्यामुळे दोन ठेकेदारांचे बिल पास करण्याकरीता ८ ते १० जण बेकायदेशिरपणे गोळा होऊन दंगा करीत होते, अशी तक्रार पीएसआय अजय जाधव यांनी नोंदविली. तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, सोमवारी दुपारी देखील संजय माहुरकर यांची एकाशी स्वच्छता विभागासमोरच फ्री स्टाईल रंगली होती. मात्र ते प्रकरण आपसी सामंजस्याने मिटविण्यात आले.

टॅग्स :Amravatiअमरावती