शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मिर्झापूर ग्रामवासीयांचा एच.जी. इन्फ्राविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:17 IST

तालुक्यातील मिर्झापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत विनापरवानगी सुरू असलेले एच.जी. इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीचा सिमेंट मिक्स प्लांट बंद करण्यासाठी गावातील नागरिक सरसावले आहेत. ग्रामपंचायतीने बजावलेल्या नोटीसला कंपनीने केराची टोपली दाखविली आहे.

ठळक मुद्देसिमेंट मिक्स प्लांट बंद करण्याची मागणी : कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील मिर्झापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत विनापरवानगी सुरू असलेले एच.जी. इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीचा सिमेंट मिक्स प्लांट बंद करण्यासाठी गावातील नागरिक सरसावले आहेत. ग्रामपंचायतीने बजावलेल्या नोटीसला कंपनीने केराची टोपली दाखविली आहे.अचलपूर ते मोर्शी या ६० किलोमीटर अंतरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम कंत्राट जयपूर येथील एच.जी. इन्फ्रा कंपनीने घेतले आहे. सदर रस्ता तयार करण्यासाठी लागणाऱ्या सिमेंट व काँक्रीट मिक्स करण्याचे प्लांट सदर कंपनीने चांदूर बाजार शहरालगत असलेल्या मिर्झापूर ग्रामपंचायत हद्दीत सुरू केला आहे. या ठिकाणी दोन सिमेंट मिक्स प्लांट सुरू करण्यात आले असून, सदर कंपनीने एकच सिमेंट मिक्स प्लांट सुरु करण्याची परवानगी ग्रामपंचायततर्फे घेतली आहे. मात्र, या एका परवानगीवर आणखी एक सिमेंट मिक्स प्लांट मिर्झापूर ग्रामपंचायतीत सुरू आहे. विनापरवानगी सुरू असलेल्या मिक्स प्लांटविरोधात ग्रामपंचायत प्रशासनाने तीन ते चार वेळा नोटीस बजावली. मात्र, या नोटिशींना केराची टोपली दाखवीत ही कंपनी मनमानी करीत आहे. एच जी इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीचे राजकीय तसेच शासकीय अधिकाºयांशी लागेबांधे असल्याने या कंत्राटदार कंपनीची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे नागरिकांतर्फे बोलले जात आहे.तालुक्यात दिवस-रात्र गौण खनिज उत्खनन करणे, काँक्रिट रस्त्याच्या बांधकामावर नियमानुसार क्युरिंग न करणे, ओव्हरलोड ट्रॅक्टरने सर्रास वाहतूक करणे, नियम बाह्य बांधकाम करणे, नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक असलेल्या रासायनिक द्रव्यांचा वापर करून अनधिकृत प्लांट सुरू करणे, पर्यावरण विभागाची नियमानुसार अंमल बजावणी न करणे आदी नियमांना तिलांजली देत सदर कंत्राटदार कंपनी राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत आहे.अखेर या कंत्राटदाराविरुद्ध मिर्झापूर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी एल्गार पुकारला असून, विनापरवानगी सुरू असलेला हा सिमेंट मिक्स प्लांट त्वरित बंद करावा, अशी मागणी होत आहे. सिमेंट मिक्स प्लांट विरोधात दंडात्मक कारवाई न झाल्यास मिर्झापूर ग्रामवासी आमरण उपोषणाचा पवित्रा घेणार आहे. यासंदर्भात एच. जी. इन्फ्रा कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.एच जी इन्फ्रा कंपनीने विनापरवानगी आमच्या ग्रामपंचायत हद्दीत मोठा सिमेंट मिक्स प्लांट उभारले आहे. कंत्राटदारांच्या मनमानी कारभार विरुद्ध दंडात्मक कारवाई ना झाल्यास गावकरी रस्त्यावर उतरणार आहे.- सुभाष घोरमडे,नागरिक मिरझापुर