शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
2
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
3
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
4
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
5
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
6
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
7
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
8
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
9
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
10
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
11
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
12
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
13
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
14
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
15
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
16
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
17
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
18
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
19
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
20
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!

त्याची संगीत क्षेत्रातील कामगिरी ‘डोळस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 1:05 AM

जिद्द, चिकाटी व त्याला प्रामाणिक प्रयत्नांची जोड असेल, तर या जगात काहीही साध्य करता येते, असा ठाम विश्वास बाळगून साहिल गजानन पांढरे या दृष्टिहीन विद्यार्थ्याने संगीत क्षेत्रात आगळी ओळख निर्माण करीत नेत्रदीपक यश संपादन केले.

ठळक मुद्देदृष्टिहीन साहिलची गरूडझेप : डॉ. नरेंद्र भिवापूरकर विद्यालयाचा विद्यार्थी

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिद्द, चिकाटी व त्याला प्रामाणिक प्रयत्नांची जोड असेल, तर या जगात काहीही साध्य करता येते, असा ठाम विश्वास बाळगून साहिल गजानन पांढरे या दृष्टिहीन विद्यार्थ्याने संगीत क्षेत्रात आगळी ओळख निर्माण करीत नेत्रदीपक यश संपादन केले.साहिलने एका वाहिनीवरील कार्यक्रमात तीन महिने महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येतील संगीत रसिकांना त्याच्या मुखातून निघणाऱ्या बहारदार गीतांनी मंत्रमुग्ध केले. तो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका ठरला. तेथे मिळालेली संधी व अनुभवातून खूप काही शिकता आल्याचे समाधान व्यक्त करीत यानंतरही आपण संगीत क्षेत्रातील जिद्द सोडणार नाही. पुढे संधी मिळाल्यास त्याचे सोनं करूच, असा विश्वास त्याने शनिवारी 'लोकमत'शी गप्पांदरम्यान व्यक्त केला. पुलगाव तालुक्यातील विरुळ आकाजी या लहानशा गावात साहिलचा जन्म झाला. वडील गजानन पांढरे हे गवंडीकाम करतात. आई शेतमजुरी करते. मोठा भाऊ अकरावीवीत शिकतोय. जन्मत:च दृष्टिहीन असलेल्या साहिलला गावातील भजन मंडळीत जाण्याची आवड होती. येथूनच त्याला संगीताची आवड निर्माण झाली. शिक्षणासाठी पहिल्या वर्गात अमरावती येथील डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात दाखल झाला. आता तोे १४ वर्षांचा असून, इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. इयत्ता सातवीत त्याला ७० टक्के गुण मिळाले. संगीत शिक्षक सोपान रत्नपारखी यांनी त्याच्यातील गायनाचा गुण नेमका हेरला. मुख्याध्यापक नवनाथ इंगोले यांच्यासोबत आपण नागपूरला आॅडिशनसाठी गेलो. त्याच ठिाकाणी सिलेक्ट झालो. मी यावेळी ‘मन हा मोगरा’ अभंग गायिले. गझल सम्राट भीमराव पांचाळे यांची 'अंदाज आरशाचा' ही गझल सादर केली. सुरेश वाडकरांची 'विठ्ठल आवळी' हा अभंग गायिला. पुढे संगीत क्षेत्रातच करियर करायचे असून, उस्ताद रशीद खान साहेब हे संगीत क्षेत्रातील आदर्शस्थानी असल्याचा उल्लेखही त्याने केला.रत्नपारखी सरांकडून संगीताचे धडेमला संगीत शिक्षक सोपान रत्नपारखी यांच्याकडून संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. अलंकार, वेगवेगळे राग त्यांनी शिकविले. मी अभंगासह क्लासिकलचेही प्रशिक्षण त्यांच्याकडून घेतले, असा उल्लेख साहिल याने केला.