घरकूल नाही : बीपीएल यादीपासून कोसो दूरधामणगाव रेल्वे : शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत आजही पोहचल्या नसल्याचे ज्वलंत उदाहरण या गावात असून मागील ३० वर्षांपासून एक अपंग घरकुलासाठी आपला लढा देत आहे़तीन हजार लोकवस्तीच्या या गावात जन्मापासून मारूती नथ्थु बायसरप हे रहिवासी आहेत़ एका पायाने कायमचे अपंगत्व असल्याने कोणतेही काम मारूतीकडून होत नाही़ किमान शासनाच्यावतीने अपंंगत्वाचा दाखला मिळावा म्हणून त्याची धडपड अनेक वर्षांपासून सुरू आहेत. कुटुंबात पत्नी व एक मुलगा तसेच एक मुलगी असल्याने मुलाने शाळा सोडून गावात मोलमजुरीचे काम सुरू केले़ अपंगांना घरकूल योजनेत कोणतेही प्राधान्य दिले जात नाही़ परंतु बीपीएल यादीत आपल्या नावाचा समावेश व्हावा म्हणून मारोती दारोदारी मागील दहा वर्षांपासून फिरत आहे़ बीपीएल यादीत नावच नसल्याने कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही़ बायसरफ कुटुंब आपल्या नशिबाला दोष देत कुडाच्या घरात राहत आहेत़ पावसाळ्यात घरात पाणी शिरल्यामुळे सर्व धान्य ओले होते़ तर रात्री मंदिराचा आश्रय घेऊन या कुटुंबाला रहावे लागते, अशीच अवस्था भातकुली येथील प्रियतम ढाक या अपंग युवकाची आहे़ वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आई घराची जबाबदारी सांभाळते. परंतु रहायला घरच नाही़ कुटुंबप्रमुख म्हणून सकाळी महाविद्यालयीन शिक्षण तर दुपारी रोजंदारीचे काम हा युवक करीत आहे़ शासनाने अपंग असलेल्या या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्वीकारून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकातील या कुटुंबाला द्यावा, अशी मागणी येथील सरपंच सत्यकला रवी सोनवणे यांनी केली आहे़
त्याच्या नशिबी आजही दारिद्र्य
By admin | Updated: October 17, 2015 00:13 IST