शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'स्ट्राँग रुम' परिसरात हायअलर्ट

By admin | Updated: October 18, 2014 00:47 IST

अमरावती व बडनेरा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी रविवारी सकाळी ७ वाजतापासून विलासनगर परिसरातील शासकीय धान्य गोदामात ...

अमरावती : अमरावती व बडनेरा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी रविवारी सकाळी ७ वाजतापासून विलासनगर परिसरातील शासकीय धान्य गोदामात होणार असून त्याकरिता स्ट्राँग रुम परिसरात पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी स्ट्राँग परिसरातील पोलीस सुरक्षेची पाहणी करुन सुरक्षेबाबत पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले. नागरिकांना तसेच उमेदवारांनाही मतमोजणीनंतर हाती येणाऱ्या निकालाचे वेध लागले आहेत. अमरावती, बडनेरा मतदारसंघातील मतमोजणी विलासनगरातील शासकीय धान्य गोदामात करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत निर्विघ्नपणे पार पडावी, याकरिता पोलीस विभाग सुसज्ज आहे. विलासनगरातील शासकीय गोदाम परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. स्ट्राँग रूम परिसरातील बाहेरच्या घडामोडींवर पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे. मतमोजणीच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पोलीस विभाग सज्ज झाला आहे. मतमोजणीच्यावेळी विलासनगर मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येईल. गोदामाच्या प्रवेशद्वारावर २० जवान तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय पोलीस दल व एसआरपीएफचे जवान गोदाम परिसराची देखरेख करीत आहेत. या व्यतिरिक्त स्टाँग रुमच्या सुरक्षेसाठी २ एसआयपीएफचे सेक्शन ( प्रत्येकी २० जवान), आरपीएसएफचे एक प्लॅटुन, ३ मोर्चे उभारणी, २ टॉवरवर दोन जवान परिसराच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आले आहेत. अशा तगड्या बंदोबस्तामध्ये दोन मतदारसंघांची मतमोजणी होईल. शहरातील वाहतुकीत बदलअमरावती : विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेकरिता शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. विलास नगरातील शासकीय धान्य गोदामात होणाऱ्या मतमोजणीच्या दृष्टीने त्या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. चौधरी चौक ते शेगाव नाका चौक या मार्गावरील सिंधी चौक ते कॉटन मार्केट चौकपर्यंत दोन्ही बाजूने वाहतूक करणाऱ्या वाहनांना १९ आॅक्टोबर सकाळी ६ ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत प्रवेश बंदी राहील, असे आदेश पोलीस उपायुक्त बी. के. गावराने यांनी पारित केले आहे. पर्यायी मार्ग म्हणून चौधरी चौकाकडून शेगाव नाक्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने चौधरी चौक, बाबा कॉर्नर मार्ग किंवा खत्री मार्केट ते इर्विन चौक मार्गाने आगमन करतील. शेगाव नाका ते चौधरी चौकाकडे येणारी वाहने ही शेगाव नाक्यावरुन पंचवटी चौक किंवा कठोरा नाका मार्गाने ये-जा करतील अशी अधिसूचना पोलीस विभागाकडून देण्यात आले आहे. या अधिसूचनेचे उल्लघंन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत १९८८ व महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.