शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षितांच्या वस्तीत चालायचा कुंटणखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:21 IST

डॉक्टर, वकील, राजकीय पदाधिकारी, सेवानिवृत्त डीवायएसपी यांसारख्या उच्चशिक्षितांच्या भूमिपुत्र कॉलनीत कुंटणखाना चालविला जात असल्याने रहिवासी त्रस्त होते.

ठळक मुद्देभूमिपुत्र कॉलनीवासी त्रस्त : आवाज उचलणाऱ्यांचे दाबले जायचे तोंड

लोकमत आॅनलाईनअमरावती : डॉक्टर, वकील, राजकीय पदाधिकारी, सेवानिवृत्त डीवायएसपी यांसारख्या उच्चशिक्षितांच्या भूमिपुत्र कॉलनीत कुंटणखाना चालविला जात असल्याने रहिवासी त्रस्त होते. मात्र, ज्याने आवाज उचलला, त्याचे तोंड दाबण्याचेही प्रकार चालायचे. त्यामुळे या कुंटणखान्याला विरोध करण्याचे कोणीही धाडसच केले नाही.भूमिपुत्र कॉलनीतील मनीष मार्टिनच्या घरात चालणाºया कुंटणखाना बहुतांश तरुणांना परिचित आहे. प्रेमीयुगुलांसाठी तर ते प्रेमालापाचे ठिकाणच बनले होते. प्रेमीयुगुल किंवा वेश्याव्यवसायातील मुली आॅटोरिक्षाचालकांच्या माध्यमातून मार्टिनच्या घरापर्यंत पोहोचायच्या. आत शिरल्यानंतर चार भिंतीच्या आड जे काही व्हायचे, ते भूमिपुत्र कॉलनीवासीयांसाठी दैनंदिन चर्चेचा भाग बनला होता. मात्र, त्याकडे परिसरातील उच्चशिक्षितांनी दुर्लक्ष केले होते. हा गंभीर प्रकार रहिवाशांनी उघड करणे व विरोध करणे अपेक्षित होते. पोलिसांच्या माध्यमातून हा गंभीर प्रकार रहिवाशांना बंद पाडता आला असता. मात्र, मार्टिनच्या घरात चालणाऱ्या या गंभीर प्रकाराचा विरोध करण्याचे कोणाचेच धाडस झाले नाही. मार्टिनच्या घरात चालणाऱ्या या प्रकाराचा विरोध एका रहिवाशांना केला होता. मात्र, मार्टिनने काठीने हल्ला करून त्यांचे तोंड बंद केले होते. यासंदर्भात मार्टिनविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल असल्याचे रहिवासी सांगत आहे. विशेष म्हणजे, मार्टिनच्या घरातील कुंटणखान्याची माहिती पोलिसांनीही होती. त्यांनीच दखल घेतली नाही, तर मग जनसामान्यांनी पुढे कसे यावे, असा प्रश्न भूमिपुत्र कॉलनीतील रहिवाशांना पडला होता. मार्टिनच्या घरातील सर्व प्रकार छुप्या मार्गाने चालायचे. त्याच्या घरात ये-जा करणारी मंडळी आस्तकदम यायची. त्यामुळे उघडपणे कोणालाच विशेष त्रास नव्हता. या स्थितीमुळे रहिवाशांनी आपले डोळे बंद करून कुंटणखान्याला विरोधच केला नाही. महिलांसाठी लज्जास्पद वाटणाºया या गंभीर प्रकारावर रहिवाशांनीच दुर्लक्ष केल्यामुळे मार्टिनचे हौसले बुलंद झाले. अखेर एका मुलीच्या तक्रारीमुळे मनीष मार्टिनच्या कुंटणखान्याचा पदार्फाश झाला आहे.