शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधात मदत केल्याने तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:08 IST

बहिणीसोबत मित्राचे प्रेमसंबंध जुळविण्यास मदत केल्याच्या रागातून भावाने अन्य साथीदारांसह एका तरुणाची चाकूने हल्ला करून हत्या केली. योगेश पुंडलिक गाडे (३५,रा. महात्मा फुलेनगर) असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देराहुलनगरातील घटना : दोन अटक, एक पसार, १० पर्यंत पीसीआर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहिणीसोबत मित्राचे प्रेमसंबंध जुळविण्यास मदत केल्याच्या रागातून भावाने अन्य साथीदारांसह एका तरुणाची चाकूने हल्ला करून हत्या केली. योगेश पुंडलिक गाडे (३५,रा. महात्मा फुलेनगर) असे मृताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास फे्रजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिच्छुटेकडी स्थित राहुलनगरात घडली. या प्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी पसार झाला आहे.पोलीस सुत्रानुसार सुशील ऊर्फ खांड्या राजेंद्र वानखडे (२९,रा. महात्माफुलेनगर, नवसारी) व सय्यद नाजीम स. सालार (२९,रा. बिच्छुटेकडी) अशी अटक आरोपींची नावे असून, शाहरूख नावाचा एक आरोपी पसार झाला आहे. आरोपी सुशीलच्या बहिणीशी एकतर्फी प्रेमातून सागर प्रभाकर वसुकर हा पाठलाग करायचा.सागर हा बहिणीची छेडखाणी करीत असल्याचे सुशीलला माहिती झाले होते. तिमे गाडगेनगर पोलिसांकडे तीन दिवसांपूर्वी तक्रारही दिली होती. पोलिसांनी सागर वसुकरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला. पोलीस सागरच्या शोधात होते. दरम्यान, रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सुशीलने संतोष शिवदास वानखडेला फोन करून योगेश गाडेला पंचवटी चौकात घेऊन येण्याचे सांगितले. त्यानुसार संतोष व योगेश हे दोघेही रात्री ९.१० वाजता पंचवटी चौकात पोहोचले आणि आरोपींना भेटले.विश्वनाथ गडलिंगची चौकशीआरोपींनी संगनमत करून योगेश गाडेला दुचाकीवर बसवून चपराशीपुरा मार्गे राहुलनगरात गेले. त्याच्यासोबतच संंतोष वानखडेसुद्धा आपली दुचाकी घेऊन पोहोचला. आरोपींनी योगेश गाडेला राहुलनगरातील रहिवासी विश्वनाथ गडलिंग यांच्या घरावरील स्लॅबवर नेले. त्यावेळी रात्रीचे ९.३० वाजले होते. सागर वसुकरला सपोर्ट का करतो, तुला आज मारतो, असे म्हणून आरोपी सय्यद नाजीम व शाहरुख या दोघांनी काठीने योगेशला मारहाण सुरू केली.सुशीलने चाकू काढून योगेशच्या मांडीवर व पायावर वार केले. जीव वाचविण्यासाठी रक्तबंबाळ अवस्थेत योगेशने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. शेजारीच असणाऱ्या एका कौलाच्या घरावर छंलाग लावून तो पळून जात असताना, अचानक चक्कर येऊन तो रावसाहेब गोंडाणे यांच्या घरासमोर खाली पडला. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. रावसाहेबांनी सीआर मोबाइल व्हॅनला माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जखमी योगेशला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फे्रजरपुरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. संतोष वानखडे याच्या तक्रारीवरून आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ३६४, ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात डीबी पथकातील प्रवीण ढवळे, अनूप झगडे, सागर भजगवरे व राम लोखंडे यांनी आरोपींना अटक केली.विश्वनाथ गडलिंग याच्या परिचयातील आरोपी नाजीम हा मित्रांना घेऊन स्लॅबवर गेला होता. गडलिंग याच्या घराविषयी परिसरात काही वेगळीच चर्चा आहे. फे्रजरपुरा पोलिसांनी घरमालक गडलिंगला चौकशीकरिता ताब्यात घेतले होते.जखमी योगेशची घरावर उडीआरोपींनी योगेश गाडेवर चाकूने हल्ला करून पाय व मांडीवर तीन घाव मारले. त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत योगेशने शेजारच्या कौलाच्या घरावर उडी घेतली. उडी घेताच त्याचे पाय कौलात फसले होते. मात्र, जीव वाचविण्याच्या धडपड करीत योगेशने पळ काढत घरावरून मुख्य रस्त्यावर उडी घेतली. त्यानंतर चक्कर येऊन तो खाली पडला.सागर वसुकरला अटकसुशीलच्या बहिणीवर एकतर्फी प्रेम करणारा सागर वसुकरला गाडगेनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. विनयभंग प्रकरणात तो पसार होता. योगेश गाडे हा सागर वसुकरचे सुशीलच्या बहिणीशी प्रेमसुत जुळविण्यात मदत करीत होता. तिच्या फेसबुकवर संदेश पाठवून सागरशी प्रेमसंबध ठेवण्याचे सल्ले देत होता. त्यामुळे योगेशला अद्दल घडवायची, या उद्देशाने आरोपींनी हल्ला केला होता.आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचेचआरोपी सुशील, स. नाजीम व शाहरूख हे तिघेही गुन्हेगारी वृत्तीचे असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. नाजीम हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून, तो एका प्राणघातक हल्लाप्रकरणातून निर्दोष सुटला आहे. त्याचप्रमाणे सुशील वानखडेविरुद्ध काही वर्षांपूर्वी मारहाण व हल्ल्याचे गुन्हे दाखल आहे. या आरोपींविरुद्ध पोलिसांनी पूर्वी प्रतिबंधात्मक कारवायासुद्धा केल्या आहेत.एका आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबध जुळविण्यात मदत करीत असल्याच्या कारणावरून योगेश गाडेची हत्या झाली. दोन आरोपींना अटक केली. १० मेपर्यंत पीसीआर मिळाला आहे. एकाचा शोध सुरू आहे.- चिन्मय पंडित,पोलीस उपायुक्त.