शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीसाठी मिळणार मदत

By admin | Updated: February 3, 2017 00:18 IST

गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. अनेक तालुक्यांत अतिवृष्टी झाली.

महसूलचे आदेश : १३ हजार हेक्टर क्षेत्राकरिताअमरावती : गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. अनेक तालुक्यांत अतिवृष्टी झाली. यामुळे बाधित पिकांना शासनाद्वारे मदत देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. याबाबत ९ जानेवारीला महसूल विभागाचे आदेश धडकले. राज्यात गतवर्षी जून ते आॅक्टोबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिके बाधित झालीत. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक ८६७.८ मिली. व ११५.२ टक्के पाऊस पडला. यामुळे सोयाबीन, तूर, मूग व उडीद पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये ३३ टक्क्यावर नुकसान झालेल्या पिकांना शासन निर्णयामुळे मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर या पीक विमा योजनेच्या निकषानुसार विमा यंत्रणेद्वारे मदत देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा काढला आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेंतर्गत मंडळनिहाय भरपाईची जी मदत देय असेल त्या रकमेच्या ५० टक्के प्रमाणात विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात ५२ दिवस विविध गावांमध्ये अतिवृष्टी झाली. यामुळे सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी साचल्यामुळे हजारो हेक्टरमधील तूर पिकावर ‘मर’ रोगाचे आक्रमण झाले. यामुळे सरासरी उत्पन्नात घट झाली. आता शासनाने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे बाधित पिकांना मदत मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.दोन हेक्टर मर्यादेत राहणार मदतप्रचलित नियमानुसार शेती व बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीसाठी ३३ टक्के व त्याहून अधिक नुकसान झालेल्यांसाठी ही मदत मिळणार आहे. ही मदत दोन हेक्टर मर्यादेत मिळणार आहे. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्याबाबत शासनाला सादर अहवालानुसार ही मदत मिळणार आहे. पंचनाम्यासोबत छायाचित्र अनिवार्यअतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसानग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्यासोबत जीपीएस छायाचित्र आवश्यक आहे. उभे पीक, त्याचे नुकसान या सर्व बाबीसोबत संबंधित शेतकरी शेतात उभे असल्याचे या चित्रात दिसावयास हवे. मदत बँक खात्यात थेट रकम जमा करण्यात येईल व या मदतीमधून बँकेला कोणत्याही प्रकारची वसुली करता येणार नाही.