शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हॅलोऽऽऽ रेडिओ अमरावती कारागृह..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:13 IST

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी ‘सुधारणा व पुनर्वसन’ अंतर्गत विविध उपक्रम राबवून त्यांना ‘माणूस’ घडविण्याचा ध्यास घेतला आहे. याच श्रुखंलेत बंदीजनांसाठी ‘हॅलोऽऽऽ रेडिओ अमरावती कारागृह..!’ हा नवा उपक्रम ३ जूनपासून सुरू होत आहे.

ठळक मुद्देरविवारपासून प्रारंभ : बंदीजनांच्या पसंतीनुसार भावगीत, आपकी फर्माइश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी ‘सुधारणा व पुनर्वसन’ अंतर्गत विविध उपक्रम राबवून त्यांना ‘माणूस’ घडविण्याचा ध्यास घेतला आहे. याच श्रुखंलेत बंदीजनांसाठी ‘हॅलोऽऽऽ रेडिओ अमरावती कारागृह..!’ हा नवा उपक्रम ३ जूनपासून सुरू होत आहे. त्याकरिता कारागृह प्रशासनाने स्वतंत्र रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि त्यासाठी लागणारे अद्ययावत साहित्य, यंत्र खरेदीसाठी बंदीक ल्याण निधी, देणगीदात्यांची मदत घेतली. रेडिओ जॉकी अमर राठी व सुदर्शन विघ्ने हे बंदीजन राहतील. कारागृहातील १६ बराकीसह महिला कक्षातही ईको साऊंड सिस्टीम बसविले आहेत. बंदीजनांच्या पसंतीनुसार भावगीते, जुनी- नवी चित्रपट गीते, बातम्यांचे शीर्षकदेखील बराकीतच ऐकता येतील. सुसज्ज रेडिओ केंद्राचे उद्घाटन ३ जूनला सकाळी ११ वाजता कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या हस्ते तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश विमलनाथ तिवारी, कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव यांच्या उपस्थितीत होईल.बराकीत लागले बॉक्सकारागृहात बंदीजनांना रेडिओतून मनपसंत गीतांची मेजवानी घेता यावी, यासाठी प्रत्येक बराकीत बॉक्स लावण्यात आले आहेत. फर्माइशी गीतांसाठी बंदीजनांना चित्रपटाचे नाव, गीताचे बोल यासह सविस्तर माहिती चिठ्ठी बॉक्समध्ये टाकावी लागणार आहे. त्यानंतर बंदीजनांच्या आवडी-निवडीची गीते इंटरनेटद्वारे डाऊनलोड केली जातील. रेडिओ केंद्रातून बंदीजनांची फर्माइश ऐकविली जाईल.बंदीजनांना संगीत, गीतांची मेजवानी मिळावी, यासाठी ‘हॅलोऽऽऽ रेडिओ अमरावती कारागृह..!’ हा उपक्रम सुरू होत आहे. त्याकरिता स्वतंत्र स्टुडिओ तयार झाला असून, या उपक्रमाची मुहूर्तमेढ रविवारी रोवली जाणार आहे.- रमेश कांबळे,अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती.