शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

हॅलो अमरावतीकर; तुमच्याकडे जुनी पुस्तके, पादत्राणे, कपडे आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2023 18:28 IST

नो टेंशन, महापालिकेत या: पाच झोनमध्ये ‘आरआरआर’ केंद्रे स्थापन

अमरावती: तुमच्याकडे जुनी पुस्तके, पादत्राणे, कपडे, प्लॉस्टिक व अन्य काही निरूपयोगी वस्तू आहेत का?असल्यास नो टेंशन, महापालिकेच्या पाचही झोन कार्यालयात तुम्ही ते नेऊन देऊ शकता. महापालिका प्रशासनाने त्या वस्तुंसाठी ‘रिड्यूस, रियुज आणि रिसायकल सेंटर्स’ अर्थात ‘आरआरआर’ केंद्रे स्थापित केले आहेत.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या निर्देशानुसार, १५ मे पासून पुढील तीन आठवडे शहरात ‘मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर’ हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना ‘रिड्यूस, रियुज आणि रिसायकल सेंटर्स’ स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेच्या रामपुरी कॅम्प, राजापेठ, दस्तूर नगर, बडनेरा या पाच झोनमध्ये ‘आरआरआर’ केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लॅस्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी आरआरआर केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.अमरावतीकरांचा सहभाग हवाआरआरआर केंद्राद्वारे संकलित केलेल्या वस्तू नूतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी विविध भागधारकांना सुपूर्द करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. केंद्र संचालन व जनजागृतीसाठी अमरावतीकर नागरिक व संस्थांना सहभागी करून घेऊन सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

असा आहे उद्देश

नूतनीकरणाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या सिव्हिल सोसायटी ऑर्गनॉयझेशन्सला यामध्ये सहभागी करून घेणे, पुनविनीकरण साहित्य वापरणाऱ्या स्टार्टअप आणि ‘फास्ट मुविंग कंझुमर गुड्स’ कंपन्यांसोबत भागीदारी प्रस्थापित करणे, नागरिकांकडून वस्तू गोळा करण्यासाठी आणि त्यांना जवळच्या आआरआर केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी वितरण सेवा देणाऱ्यांशी भागीदारी करणे हा यामागचा उद्देश आहे. 

भाजीबाजार झोनमध्ये उद्घाटन‘मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर अंतर्गत भाजी बाजार झोन कार्यालयात ‘आरआरआर’ केंद्राचे उद्घाटन विशेष कार्य अधिकारी तथा स्वच्छता विभाग प्रमुख डॉ. सीमा नैताम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांनी या अभियानाला प्राधान्य देवून व मुख्य उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून या अभियानामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे असे प्रतिपादन केले.

टॅग्स :Amravatiअमरावती