शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात अतिवृष्टीने दाणादाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST

पान १ फोटो पी २३ काटकुंभ चिखलदरा : मेळघाटात धो-धो कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले आहे ...

पान १

फोटो पी २३ काटकुंभ

चिखलदरा : मेळघाटात धो-धो कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले आहे शुक्रवारी दुसऱ्या दिवशीसुद्धा तालुक्यातील अनेक मार्ग बंद होते प्रशासनाच्या वतीने कार्य सुरू असले तरी कोसळलेल्या पावसामुळे जलजन्य रोगाची साथ पसरण्याची भीती वाढविल्या जात असून यातून आरोग्य यंत्रणेची कसरत होणार आहे त्याचा फटका सर्वाधिक गर्भवती स्तनदा व कुपोषित बालकांना बसणार आहे.

गुरुवारी पहाटेपासून ढगफुटी प्रमाणे कोसळलेला पाऊस मेळघाटातील अनेक गावांचा संपर्क तोडणार ठरला नदीनाल्यांना आलेला पूर कमी होत असला तरी सेमाडोह माखला, बिबा ते बोदू या दुर्गम भागातील मार्ग बंद आहेत. ते सुरळीत करण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी दिली. पावसामुळे चार घरांची पडझड होऊन नुकसान झाले. जामली आर. येथील सोना साकू कासदेकर यांचे घर कोसळले मनभंग, भिलखेडा, भांद्री, आडनदी, खीरपाणी, सावरपाणी, गरजदरी येथील शेतीचे नुकसान झाले आहे.

बॉक्स

काटकुंभ येथे दूषित पाण्याचा पुरवठा

तालुक्यातील काटकुंभ येथे दूषित पाणी ग्रामपंचायतीच्या नाळ योजनेतून झाल्यामुळे तीन किलोमीटर अंतरावरून डोमा येथील हातपंपाचे पाणी नागरिकांना आणावे लागत आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील अनेक गावातील असल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

जलजन्य आजाराची भीती काय

मागील दोन दिवसापासून मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे आदिवासी पाड्यांना दूषित पाणीपुरवठा होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने काळजी घेणे गरजेचे आहे परंतु अनेक गावांमध्ये दुषित पाणी मिळत असल्याने जलजन्य आजाराची भीती वर्तविली जात आहे याचा सर्वाधिक फटका गर्भवती स्तनदा व कुपोषित बालकांना बसणार असल्याची भीती आरोग्य यंत्रणेने वर्तविली आहे तर दुसरीकडे मार्ग बंद झाल्यास आजारी रुग्ण गर्भवती मातांना उपचारार्थ दाखल करणे कसरत करणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान यांनी लोकमतशी बोलताना सांगितले

कोट

बंद रस्ते व दूषित पाण्यामुले ज्याला यांना आजाराची भीती आहे सर्वाधिक आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे नागरिकांनी पाणी गाळून उकळून प्यावे असे आव्हान करण्यात आले आहे थांबून थांबून पाऊस होत असल्याने डबक्यातील साचलेल्या पाण्यामुळे डासांची भीती आहे कुपोषित बालक गर्भवती व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जात आहे

सतीश प्रधान

तालुका वैद्यकीय अधिकारी

चिखलदरा