शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:13 IST

जिल्ह्यात चोवीस तासांपासून दमदार पावसाने मूळ धरले. पावसामुळे रविवारी चांदूर रेल्वे तालुक्यातील पुनर्वसित घुईखेडमध्ये पहिल्याच पावासचे पाणी घरांमध्ये शिरले. मेळघाटात नदी-नाले वाहते झाले, तर अचलपूर शहर शनिवारच्या पावसाने धुतले गेले. पावसाचा आनंद जिल्ह्यात सर्वत्र नागरिक घेत आहेत.

ठळक मुद्देअचलपूर शहरात धो-धो : मेळघाटातही वाहिले नदी-नाले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात चोवीस तासांपासून दमदार पावसाने मूळ धरले. पावसामुळे रविवारी चांदूर रेल्वे तालुक्यातील पुनर्वसित घुईखेडमध्ये पहिल्याच पावासचे पाणी घरांमध्ये शिरले. मेळघाटात नदी-नाले वाहते झाले, तर अचलपूर शहर शनिवारच्या पावसाने धुतले गेले. पावसाचा आनंद जिल्ह्यात सर्वत्र नागरिक घेत आहेत.घुईखेडमधील घरांत शिरले पाणीचांदूर रेल्वे : बेंबळा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे तालुक्यातील घुईखेड या पुनर्वसित गावातील अर्ध्या घरांमध्ये पहिल्याच पावसात पाणी शिरले. त्यामुळे प्रकाश मुळे, धीरज नेवारे, श्रीराम संसारे, सुनंदा मुळे यांचे मोठे नुकसान झाले. गावात भूखंड वाटप करताना जागा समतल न केल्याने ही स्थिती उद्भवली. काही नाल्यांचे पाणी विहिरींमध्ये शिरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. वरिष्ठांनी सदर गावाची पाहणी करून गावकऱ्यांना भयमुक्त करावे व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.चाकर्दा परिसरात दमदार पाऊसधारणी : मेळघाटात मान्सूनचे रविवारी दुपारी ४ वाजता दमदार आगमन झाले. धारणी तालुक्यातील चाकर्दा परिसरात तब्बल तासभर धो-धो पाऊस बरसल्याने शेतातून पाणी वाहून निघाले. परिणामी अनेक महिन्यांपासून कोरडे पडलेले नाले दुथडी भरून वाहू लागले. त्यामुळे आदिवासी नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून, पेरणीची लगबग सुरू झाली आहे.अचलपुरात पहिल्याचपावसाने जनजीवन विस्कळीतअचलपूर : शहरात शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसाने अचलपूरकरांना अक्षरश: झोडपून काढले. पावसाळ्यातील पहिल्याच पावसाने सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील अकबरी चौक, चावलमंडी, टक्कर चौक, तहसील रोड, अभिनव कॉलनी, खिडकी गेट, दुल्हा गेट, संगत, माळवेशपुरा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. चेडे एंटरप्रायजेससमोर तलावच बनला होता. अकबरी चौकात काही दुकानांमध्ये पाणी शिरले. अचलपूर ते रेल्वे स्टेशन रोड परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली. दर्गा, इदगाह, रेल्वेस्टेशन चौक परिसरात विद्युत तारा तुटल्याने रात्रभर अंधार होता. रविवारीदेखील पाऊस कोसळत होता.