शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५९ प्राथमिक‎ आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष‎, आरोग्य यंत्रणा अलर्ट 

By जितेंद्र दखने | Updated: April 20, 2023 18:46 IST

अमरावती जिल्ह्यातील ५९ प्राथमिक‎ आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष उभारण्यात आली आहेत. 

अमरावती: उन्हाची दाहकता दिवसागणिक वाढत आहे.‎ त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता‎ आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष ‎कार्यान्वित केले आहेत. दरम्यान, वातावरणातील  बदलाबाबत जागृती निर्माण करणे, आरोग्य संस्था वातावरणातील बदलासाठी अधिक सक्षम करणे,‎ त्यासाठी आवश्यक ती तयारी आणि मनुष्यबळ ‎ प्रशिक्षित करण्यात येत आहे.‎ 

वातावरणातील बदलाचा परिणाम मानवी ‎आरोग्यावर; तसेच विविध आजारांच्या प्रमाणावर‎ होत आहे. या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊनच २०२०-२१ पासून राष्ट्रीय वातावरणातील बदल‎ आणि मानवी आरोग्य कार्यक्रम आरोग्य अभियानामध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. ‎वातावरणातील बदलाला संवेदनशील असणाऱ्या ‎आजारांना समर्थपणे तोंड देता यावे, यासाठी सर्व‎ नागरिक आणि विशेषतः लहान मुले, महिला,‎ वृद्धांसह नागरिकांसाठी आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण‎ करण्यात येत आहे.‎ उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका निर्माण होत‎ ‎ आहे. अशा परिस्थितीत तत्काळ उपचार होणे‎ गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील ६६ प्राथमिक‎ आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष तयार करण्यात‎ आले आहेत. ही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्याचक्कर येणे सुस्त वाटणे, त्वचा‎ लालसर होणे, मळमळ, उलट्या होणे, हृदयाचे‎ ठोके वाढणे आदी उष्माघाताची लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तातडीने डॉक़्टरांचा सल्ला घ्यावा.

हीट वेव्ह म्हणजे काय?हीट वेव्ह किंवा उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. सर्वसाधारपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमानात ३ अंश सेल्सिअसने जास्त असेल, तर त्याला उष्णतेची लाट, असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, तर त्या भागात उष्णतेची लाट आली आहे, असे समजावे. दिवसेंदिवस उन्हाचा पार चांगलाच वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ५० पीएचसीमध्ये उष्माघात कक्ष सुरू केलेले आहेत. या ठिकाणी आवश्यक औषधी व डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे. खबरदारीच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना दिलेल्या आहेत. नागरिकांनी उष्माघाताची लक्षणे आढळताच डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. - डॉ. सुभाष ढोले, 

 

टॅग्स :Amravatiअमरावती