अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात सोमवारी दोन तक्रारींवर सुनावणी झाली. प्रलंबित नऊपैकी पाच प्रकरण निकाली निघाली असून एका प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाला.सोमवारी जिल्हा लोकशाही दिन सभेत अप्पर जिल्हाधिकारी यांनी स्वत: निवेदन स्विकारली. एकूण २७ निवेदन प्राप्त झाली. निवेदनावर संबंधित कार्यालयप्रमुखांनी कार्यवाही करुन निवेदकांचे समाधान करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले. महसूल - तीनपैकी एक प्रकरणाचा अहवाल प्राप्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती - १, जिल्हा पुरवठा अधिकारी - २ पैकी २ प्रकरण निकाली, पोलिस आयुक्त शहर - एक, जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख - दोन प्रकरणे निकाली काढण्यात आली.
लोकशाही दिनात दोन तक्रारींवर सुनावणी
By admin | Updated: July 7, 2015 00:21 IST