शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आयुक्तांनी घेतली हरकतींवर सुनावणी

By admin | Updated: November 18, 2016 00:21 IST

नगरपालिका निवडणुकांचा बिगूल वाजल्यानंतर जिल्हा परिषदेची रणधुमाळी दोन महिन्यांनंतर सुरू होणार आहे.

जिल्हा परिषद : अंतिम प्रभाग रचना व आरक्षण २५ नोव्हेंबरला होणार निश्चितअमरावती : नगरपालिका निवडणुकांचा बिगूल वाजल्यानंतर जिल्हा परिषदेची रणधुमाळी दोन महिन्यांनंतर सुरू होणार आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. जि.प आणि पं. स.च्या प्रभाग रचना व निर्धारित आरक्षणावर आक्षेप व हरकतींवर गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक राजकीय दिग्गजांचे उभे राहण्याचे मनसुबे उधळले. जिल्हा परिषदेच्या ५९ तर पंचायत समितीच्या ९८ मतदारसंघाचा प्रारुप प्रभाग रचनेस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण गित्ते यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. या प्रारुप प्रभागरचनेत विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर ५ आॅक्टोबरला आरक्षण सोडत काढण्यात आली. या प्रारुप प्रभाग रचना व आरक्षणावर जिल्हाधिकारी यांच्याकडे १० ते २० आॅक्टोबरदरम्यान हरकती व सूचना दाखल झाल्यात. दरम्यान या हरकतींवर १७ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त गुप्ता यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली. यावेळी उपायुक्त नरेंद्र फुलझेले, उपायुक्त झेंडे, नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, प्रमोद देशमुख, नवनाथ तायडे व संबंधित तहसीलदार उपस्थित होते. जिल्हाभरातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गण रचना, आरक्षण आदी विषयावर प्रशासनाकडे ४१ आक्षेप व हरकती दाखल करण्यात आल्या होत्या, त्यानुसार विभागीय आयुक्तांना आक्षेप व हरकती दाखल करणाऱ्यांची सुनावणी प्रत्यक्ष घेवून त्यांची बाजू समजून घेतली आहे. या सुनावणी साठी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, पदाधिकारी व राजकीय पुढारी विभागाीय आयुक्त कार्यालयात एकत्र आले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आक्षेप व हरकती घेण्यात आलेल्या सुनावणीवर विभागीय आयुक्त यात काही उणीवा असल्यास प्रशासन व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार यावर सुनावणीअंती आयुक्त जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्णायक गण रचना अंतिम करणार आहेत. अंतिम प्रभाग रचना व आरक्षणाची २५ नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.त्यानंतरच याबाबत खरे चित्र स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)