शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जलदगती न्यायालयातून व्हावी सुनावणी

By admin | Updated: July 19, 2014 23:40 IST

स्थानिक महादेव नगरातील अपंग महिलेवरील सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयातून करण्यासाठी आणि नराधमांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याचे

सामूहिक बलात्कार प्रकरण : राज्य महिला आयोगाच्या सदस्य मिरगे यांची मागणीअमरावती : स्थानिक महादेव नगरातील अपंग महिलेवरील सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयातून करण्यासाठी आणि नराधमांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याचे आश्वासन राज्य महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरगे यांनी दिले. महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडित महिलेची तिच्या महादेवनगर येथील निवासस्थानी जाऊन शनिवारी भेट घेतली आणि शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.या भेटीदरम्यान आशा मिरगे यांनी पीडित अपंग महिलेसोबत चर्चा करून घडलेल्या प्रसंगाची माहिती जाणून घेतली आणि सर्वतोपरी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नराधमांकडून मिळणाऱ्या धमक्या, पैशाचे आमिष किंवा अन्य दबावाला बळी न पडता खंबीरपणे उभे राहून न्यायासाठी लढावे, असा सल्ला यावेळी आशा मिरगे यांनी पीडित महिलेला दिला. त्याचप्रमाणे शासनाच्या मनोधैर्य योजनेतून अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून प्रयत्न करण्याची ग्वाहीदेखील आशा मिरगे यांनी पीडित महिलेला दिली. महिलेने या प्रसंगाचा खंबीरपणे सामना करावा, असा धीरही यावेळी आशा मिरगे यांनी पीडित महिलेला दिला. महिलांनी खंबीर व्हावेत्यांच्यासोबत महिला व बालविकासचे अमरावती विभागाचे उपायुक्त बोरखडे, सुभाष अवचार, परीविक्षा अधिकारी लसनकार, विभागीय परीविक्षा अधिकारी प्रज्ञा भिमटे, मीना प्रधान, ज्योत्स्ना तांबट, संध्या मेहरे यांच्यासह इतरही अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पीडितेनी केली न्यायाची मागणी अनुसूचित जमातीतील अपंग आणि परित्यक्ता पीडितेने न्यायाची मागणी करीत स्वत:ची व्यथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरगे यांच्यासमोर मांडली. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मेस चालवून कसाबसा उदरनिर्वाह होतो. त्यामुळे राज्य महिला आयोगाने पाठीशी रहावे, असेही पीडित महिलेने बोलून दाखविले. महिलांवर सातत्याने अन्याय, अत्याचार होत असताना प्रशासनाकडून फार गांभिर्याने ही बाब घेतली जात नाही, अशी कैफियत पिडीत महिलेने मांडली.