शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

मेळघाटातील आरोग्य कर्मचारी तीन महिन्यांपासून वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST

मेळघाटात जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य सहायक, सहायिका, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरही कर्मचारी कुपोषण बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी गावपातळीवर कोरोनाकाळातही नियमित सेवा देत आहेत.

ठळक मुद्देराज्यशासनाकडून अनुदान नाही : लेखाशीर्ष विभागाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाटातील अतिदुर्गम क्षेत्रात आरोग्यसेवा देणारे बहुसंख्य कर्मचारी तीन महिन्यांपासून वेतनाविना आहेत. आर्थिक विवंचनेमुळे आरोग्यसेवा सोडण्याच्या मानसिकतेत असल्याच्या प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी दिल्यामेळघाटात जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य सहायक, सहायिका, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरही कर्मचारी कुपोषण बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी गावपातळीवर कोरोनाकाळातही नियमित सेवा देत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील लेखा विभागाला विचारणा केली असता, त्यांच्या वेतनाच्या लेखाशीर्ष क्र. ०६२१ वर राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त नसल्याची माहिती मिळाली. राज्य शासनाने तीन महिन्यांचे वेतन अदा न केल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाकाळातही नागरिकांच्या सेवेत झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत जिल्हा परिषदेच्या सीईओंनी तातडीने दिलासादायक निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून करण्यात येत आहे.दसरा, दिवाळी सण कसा साजरा करणार?राज्य शासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता अनुदान दिले जाते. ते अनुदान जिल्हा परिषद वित्त व लेखा विभागाच्या अभिकरण लेखाशीर्षमधील उपलेखाशीर्ष क्रमांक ०६२१ वर जमा केले जाते. त्यांतर जिल्हा कोषागार कार्यालयाकडे वेतनाची रक्कम वर्ग करून कर्मचारी वेतन देयकानुसार कोषागार कार्यालयाकडून कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसद्वारे कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. तीन महिन्यांपासून ०६२१ या लेखाशीर्षवर राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाºयांना आर्थिक पेच पडला आहे.हेल्थ एम्प्लॉईज फेडरेशन पुकारणार संपहेल्थ एम्पलाईज फेडरेशन या जिल्हा पातळीवरील संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र शिंदे व पदाधिकाऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने संपाचा इशारा देणारे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांना दिले. त्यावर सीईओ काय निर्णय घेतात, याकडे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टर