शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

आरोग्य सेविकांना मिळणार न्याय

By admin | Updated: September 8, 2016 00:20 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या मेळघाटात मागील आठ ते दहा वर्षापासून सेवा देत आहे.

डिएचओंना सूचना : पालकमंत्र्यांकडून दखलअमरावती : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या मेळघाटात मागील आठ ते दहा वर्षापासून सेवा देत आहे. अशा ३३ आरोग्य सेविका आणि सेवकांना दोन वर्षापासून बदली होऊनही कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे याबाबत पालकमंत्र्याकडे याबाबत तक्रार येताच जिल्हा परिषद प्रशासनाने येत्या १५ दिवसात निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्षांसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील कार्यरत ३३ आरोग्य सेविका व सेवकांच्या २४ मे रोजी आणि ११ मे २०१५ रोजी समुपदेशनाव्दारे बदल्या केल्या आहेत. परंतु अद्यापही बदली झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले नाही. याबाबत आॅगस्ट महिन्यात एक नव्हे तर दोनवेळा निवेदन दिल्यावरही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता महिला आरोग्य सेविकांचाही मानसिकता ढासळलेली आहे. याबाबत ६ सप्टेंबर रोजी सीईओ किरण कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. मात्र तरीही समाधान कारक तोडगा न काढल्याने या आरोग्य सेविकांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे निवेदन दिले होते. यावेळी पुष्पा परांजपे, पुष्पा रामटेके, अश्र्विनी गुल्हाने, वैशाली कांबळे, चंदा बेलसरे, पद्मा जाधव, पल्लवी इंगोले, प्रिती तसरे, ललिता मेश्राम, अर्चना धुर्वे आदींची उपस्थित होती. या निवेदनानुसार पालकमंत्री यांनी झेडपीचे टिम प्रमुख व जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव यांच्याशी संपर्क करून १५ दिवसात योग्य तोडगा काढण्याचे निर्देश ७ सप्टेंबर रोजी दिले आहेत. त्यामुळे अन्याग्रस्त आरोग्य सेविकांना न्याय मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. यावर जिल्हा परिषद प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)