शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: June 1, 2015 00:39 IST

तालुक्यात प्लास्टिकचा वापर वाढत चालला आहे. वेस्टेज प्लास्टिक हे मानवांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्याला घातक ठरते आहे.

आजार वाढले : घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याकडे दुर्लक्ष सुनील देशपांडे अचलपूरतालुक्यात प्लास्टिकचा वापर वाढत चालला आहे. वेस्टेज प्लास्टिक हे मानवांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्याला घातक ठरते आहे. वेस्टेज प्लास्टिक जनावरे खात असल्याने कित्येक जनावरे मृत झाली आहेत. या प्रकारावर अंकुश लावण्याची मागणी केली जात आहे.घरांबाहेर किंवा मंगल कार्यालयांबाहेर पडलेल्या पत्रावळीतील उष्टे अन्न खाता-खाता प्लास्टिकही जनावरांच्या पोटात जाते. यामुळे विविध विकार होऊन जनावरे दगावतात. प्लास्टिकमुळे माणसांची सोय होत असली तरी जनावरांसाठी ते हानिकारक ठरत आहे. लग्नकार्यात प्लास्टिकच्या पत्रावळी, द्रोण, वाटी, चमचे आदींचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. लग्नमंडपात सार्वजनिक सभागृहात, तथा मंगल कार्यालयात लग्नकार्य पार पडले की, लोक निघून जातात. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होतो. उरलेले अन्न व प्लास्टिक पत्रावळींच्या ढिगाकडे जनावरे आकृष्ट होतात. त्यातल्या त्यात जुळे शहर तथा तालुक्याच्या गावात मोकाट जनावरांचा सुळसुळाट असल्याने बिनधास्त फिरणारी जनावरे त्यावर ताव मारताना दिसतात. प्लास्टिक पोटात गेल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. कार्यक्रम पार पडल्यानंतर प्लास्टिकच्या वस्तुंची विल्हेवाट योग्यरित्या लावणे गरजेचे असते. परंतु त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते. नगरपालिका, तालुक्यातील ग्रापंनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करुन घनकचऱ्यांची योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे. मोकाट जनावरांनी प्लास्टिकवर ताव मारल्याने त्यांना पोटाचे विविध आजार जडतात. काही गुरांच्या पोटात प्लास्टिकचा गोळा निघाल्याची उदाहरणे आहेत. एखादवेळी शेतकऱ्यांचे जनावर चुकून शहरात येते आणि प्लास्टिक खाल्ल्याने त्याला आजार जडतो. - अतुल लकडे, पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी.नगरपालिका मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास असमर्थ ठरल्याने त्यांचे आरोग्य प्लास्टिक खाल्ल्याने धोक्यात येते. याला काही प्रमाणात न.प.चे मुख्याधिकारीही जबाबदार आहेत. अचलपूर शहरातील कोंडवाडा बंद करण्यात आला आहे. मंगल कार्यालयांना लेखी सूचना द्याव्यात..- नितीन डकरे, नगरसेवक, अचलपूर.घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंगल कार्यालयांना त्यांना कारवाईच्या नोटीस बजावल्या आहेत. कार्यक्रमानंतर प्लास्टिक घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्याची लेखी तक्रार केल्यास कारवाई करु. मोकाट जनावरे मालकांनाही काही दिवसांपूर्वी समज देण्यात आली होती. - धनंजय जावळीकर, मुख्याधिकारी