शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाववासीयांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: June 30, 2015 00:18 IST

अनेक भागांत घाण साचली आहे. नाल्या तुंबल्या असून पाणी रस्त्यावरून वाहत आहे.

घाणीचे साम्राज्य : विविध आजारांची लागण होण्याची शक्यता, प्रशासन सुस्तनांदगाव खंडेश्वर : अनेक भागांत घाण साचली आहे. नाल्या तुंबल्या असून पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या डबक्यांमुळे निर्माण होणारे डास आणि जंतूंमुळे आजाराची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्यांची सफाई, नाल्यातील घाण काढून त्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगर पंचायत प्रशासनाची आहे. परंतु सफाईबाबतचे कोणतेही नियोजन नसल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गंभीर परिस्थितीत निर्माण झाली आहे. सत्तावीस हजार लोकसंख्या असलेल्या या शहराची साफसफाईची जबाबदारी केवळ ४ सफाई कामगारांवर असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. सहाही प्रभागांत घाणीने तुंबलेल्या नाल्या व साचलेली घाण दिसून येते. वॉर्ड क्रमांक १, ४ व ६ मधील काही भागांची स्थिती अतिशय वाईट आहे. नालीतील पाण्यात शेवाळ तयार झाले आहे. घाणीच्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोखड रस्त्यावरील पाणीपुरवठ्याची विहीर बंद करावी. कारण गावातील सर्व घाण पाणी या विहीरीजवळ साचत आहे. त्यामुळे मुरलेले सर्व पाणी नेहमी दूषित राहते व हे थेट नागरिकांना पुरविले जाते. त्यामुळे नगारिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. ठोस उपाययोजनेची गरजमुंगसाजी चौकातील मुख्य रस्त्यावर घाणपाणी तसेच डबके साचलेले आहेत. गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची ही स्थिती झाली आहे. या रस्त्याचे लोकप्रतिनिधींनी वर्षभरापूर्वी भूमिपूजन केल. मात्र अद्यापही रस्त्याची कामे प्रलंबित आहेत. कामे नगर पंचायतीने त्वरित सुरु करुन गैरसोय दूर करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.शोरीया कॉलनीत पावसाच्या पाण्याचे डबके नागरिकांच्या घरासमोर साचले आहेत. येथे सिमेंटचे पाईप टाकून पाणी वाहते करणे गरजेचे आहे. मागील कित्येक महिन्यांपासून चांदूररेल्वे मार्ग ते शोरीया कॉलनीतील मुख्य रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे. मात्र या कामाकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ही समस्या निकाली काढण्यात यावी.- महेश दैत, नागरिक.गावातील नाल्या बुजल्या आहेत. विविध वॉर्डांतील सार्वजनिक नळाला तोट्या नाही. हजारो लिटर पाणी व्यर्व्थ जाते. गावातील उर्दू हायस्कूल समोरील घाणीचे साम्राज्य पसरले दिसते. गावातील शेणखताचे ढिगारे उचलावे, नागरिकांचे आरोग्य दुषित होऊ शकते. -सुरेश तायडे, आरोग्य कर्मचारी