धामणगाव रेल्वे : देशव्यापी कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी जोमात राबविण्यात येत असून, सोमवारी १९३, तर आतापर्यंत १४४७ जणांना लस देण्यात आली आहे.
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात २ मार्चपासून होत असलेल्या लसीकरण मोहिमेत सर्वप्रथम आरोग्य सेवक, त्यानंतर पोलीस, नगर परिषद, पंचायत समिती व महसूल विभागातील सर्व कोरोनायोद्धांचे लसीकरण करण्यात आले. पहिला टप्पा आटोपल्यानंतर आता जेष्ठ नागरिक व दुर्धर आजारी रुग्णांना लस देण्यात येत आहे. ५२३ ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोज मिळाला. पहिल्या टप्प्यातील आरोग्य सेवक व पोलीस कर्मचाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण करण्यात येत आहे. या मोहिमेत येथील दिव्यांग बंधू भरतकुमार पसारी व चेतनकुमार पसारी यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन या लसीचा पहिला डोज घेतला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर, शुभम जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात लसीकरणाचे कार्य शिल्पा मेहरे, भारती मेश्राम, अस्मित चौधरी, प्रशांत जोशी, आशिष हगवणे करीत आहेत.