शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींसाठी उभारलेल्या आरोग्य सेवा कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:44 IST

उपजिल्हा रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांची परवड होत आहे. मेळघाटातील गर्भवती मातांच्या आरोग्यसेवेसाठीच्या उपाययोजना कूचकामी ठरल्याचा एसाच एक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देजिल्हा शल्यचिकित्सक : चौकशीअंती कारवाई करू

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : उपजिल्हा रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांची परवड होत आहे. मेळघाटातील गर्भवती मातांच्या आरोग्यसेवेसाठीच्या उपाययोजना कूचकामी ठरल्याचा एसाच एक प्रकार उघडकीस आला आहे.धारणी शहरातील २१ वर्षीय गरोदर महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्यावर सिझेरियनचे कारण सांगून तिला अमरावती येथे पाठविले. रुग्णाची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना ते परवडणारे नव्हते. येथील स्त्री व प्रसूतीतज्ज्ञ उपस्थित नव्हत्या. अन्य डॉक्टरांनीदेखील तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. दुसरीकडे येथील वैद्यकीय अधीक्षकांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.गर्भवतीला रक्तपुरवठ्यासाठी पैशांची मागणीमेळघाटातील गोंडवाडी येथील सहा महिन्यांची गर्भवती माता प्रिया रामकिसन जावरकर हिला रक्ताची आवश्यक असल्याचे सांगून आशा व डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात पाठविले. मात्र जिल्हा रुग्णालयात आल्यावर तिचे पती रामकिसन जावरकर यांना रक्तपेढीत बाराशे रुपयांची मागणी केली व सोबत एक डोनर आणण्याचे सांगितले, अन्यथा रक्त मिळणार नाही, असा दमही दिला. त्याने डॉक्टर राणा यांना कळविले. मात्र फायदा झाला नाही. अखेर उपचार न मिळाल्याने परत धारणी रुग्णालयात यावे लागले.धारणी शहरातून आरोग्य विभागाद्वारे हजारो पिशव्या रक्त संकलित केले जाते. आदिवासी रक्त विकत नाहीत, तर ते इतरांचे प्राण वाचविण्यासाठी स्वमर्जीने रक्तदान करतात. तरीही गर्भवतीला रक्त मिळू नये, ही शोकांतिका आहे.- सतीश मालवीय,माजी यु.कॉ. अध्यक्ष धारणीगर्भवती मातेला आवश्यकतेनुसार रक्त नि:शुल्क देण्याची रक्तपेढीत तरतूद आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयात पैशांची मागणी केली असल्यास याची चौकशी करून संबधितांवर कठोर कार्यवाही केली जाईल.- श्यामसुंदर निकम,जिल्हा शल्य चिकित्सक