शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:30 IST

परिसरातील १५ गावातील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात. बँक व परिसरातील गावांची बाजारपेठ आसेगाव असल्यामुळे अनेक ग्रामस्थांचा येथे राबता असतो. मात्र, बाह्यरुग्ण विभागाशिवाय अन्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीत.

ठळक मुद्देआसेगावात रूग्णांचे हाल : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पूर्णा : परिसरातील १५ गावातील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात. बँक व परिसरातील गावांची बाजारपेठ आसेगाव असल्यामुळे अनेक ग्रामस्थांचा येथे राबता असतो. मात्र, बाह्यरुग्ण विभागाशिवाय अन्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीत. किरकोळ स्वरूपाच्या रूग्णांनासुद्धा थेट जिल्ह्याच्या ठिकाणी रेफर केले जात असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.दुपारच्या सत्रात रुग्ण तपासणीसाठी गेला असता, वैद्यकीय अधिकारी येण्यास टाळतात. तपासणी न करताच त्यांची गोळ्या देऊन बोळवण केली जाते. अनेक रुग्णांना तर डॉक्टर व कर्मचाऱ्यांची ताटकळत वाट पाहावी लागते. अशा स्थितीमुळे अनेकदा वाद निर्माण होतात. त्यामुळे येथील आरोग्य केंद्र हे रुग्णांसाठी आरोग्य नव्हे, अनास्था केंद्र बनले असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सल्लागार समिती कर्मचाऱ्यांच्या अशा वागणुकीकडे मुद्दामच दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. प्रसूतीकरिता येणाऱ्या महिलांसाठी या ठिकाणी कुठलीच सोय नाही. संबंधितास तहसील वा अमरावतीला विशिष्ट कारण दाखवून जाण्याचा सल्ला देण्यात येतो. यामुळे येथील रूग्णालयाच्या आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजले आहेत. याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.महालॅब बनली शोभेची वस्तूयेथील महालॅब प्रतिनिधी रुग्णाचे रक्ताचे नमुने घेतात. मात्र, त्या रक्ताच्या नमुन्याचे रिपोर्ट मिळत नसल्याचे बराचशा रुग्णांच्या तक्रारी आहे तसेच याबाबतचे त्याच्याकडे दस्तावेजसुद्धा नसल्याचे समजते. यामुळे येथील महालॅब (रक्त तपासणी) ही शोभेची वस्तू झाली आहे.आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी मध्यंतरी महालॅबमध्ये असलेल्या कर्मचाऱ्याच्या नातलगाची तब्येत बरोबर नसल्यामुळे अनुपस्थित असल्याचे आणि आरोग्य केंद्रातील औषधसाठा पूर्ण असल्याचे सांगितले.- डॉ. समीना खानवैद्यकीय अधिकारीवरिष्ठांशी चर्चा करून रुग्णांची होत असलेली गैरसोय दूर करू. आरोग्याविषयी कोणाची तक्रार असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, जेणेकरून प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधितांशी असलेल्या तक्रारीची दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल.- श्याम मसरामजि. प. सदस्य तथा अध्यक्ष आरोग्य समिती