शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाऱ्यांसाठी तीन महिन्यांत आरोग्य शिबिर

By admin | Updated: May 9, 2017 00:13 IST

दिलीप हातीभेड : राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाची बैठकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सफाई कामगारांना आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

दिलीप हातीभेड : राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाची बैठकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सफाई कामगारांना आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे या कामगारांची दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी व शिबिर घेण्याच्या सूचना महापालिकेला केल्याची माहिती राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हातीभेड यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.महापालिकेद्वारे ही बाब मान्य करण्यात आली व आता सफाई कामगारांसाठी झोननिहाय आरोग्य शिबिर घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. हा खर्च महापालिका स्वत: सोसणार आहे. देशात सुरू असलेले स्वच्छता अभियान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे क्रांतिकारी पाऊल आहे. परिसराची स्वच्छता राखणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने वराहपालन हे शहराच्या बाहेर हवे यासाठी महापालिकेनेही वराह पालकांना जागा उपलब्ध करून द्यावी. याविषयी सोमवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली व त्यांनी ही बाब मान्य केली आहे. आजार हा कोणालाही होऊ शकतो. सफाई कामगारांच्या मुलांना आजार झाल्यास जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यांनी केला. सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांना पुरविण्यात आलेले गणवेश घालावेत, मास्क लावावेत हे त्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. दर हजार कर्मचाऱ्यांच्या मागे १ सफाई कामगार पाहीजे. अमरावती शहराची लोकसंख्या ६.५० लाख आहे. येथे सफाई कामगारांचे ८६१ पदे मंजूर आहेत. त्या तुलनेत ७६७ कामगार आहे. मात्र यामधील बहुसंख्य कामगार कंत्राटी असल्याचे त्यांनी सांगितले. सफाई कामगारांच्या समस्याचा निपटारा करण्यासाठी महापालिकेला ३ महिन्यांचा अल्टिमेटम दिल्याचे त्यांनी सांगितले. आयोगाच्या सदस्यपदाचा कार्यभार आपण १६ मार्च २०१७ रोजी स्वीकारला. या दीड महिन्याच्या अवधीत जबलपूर, कटनी, वर्धा, नागपूर, चंद्रपूर व अमरावती आदी ठिकाणी बैठकी घेतल्याचे दिलीप हातीभेड यांनी सांगितले.