शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयाची सक्ती; निवासस्थाने गळकी

By admin | Updated: August 5, 2016 00:18 IST

मेळघाटातील बिजुधावडी येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे क्वॉटर्स अतिशय शिकस्त झाले आहेत.

 वैद्यकीय कर्मचारी हैराण : बिजुधावडी आरोग्य केंद्राच्या कर्मचारी क्वॉटर्सची दुर्दशा अमरावती : मेळघाटातील बिजुधावडी येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे क्वॉटर्स अतिशय शिकस्त झाले आहेत. पावसाळ्यात तर या घरांमध्ये राहणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अतिशय हाल होतात. मात्र, जिल्हा परिषदेचे याकडे अतिशय दुर्लक्ष होत आहे. मागील चार वर्षांपासून डॉक्टरांसाठी बांधण्यात आलेले हे क्वॉटर्स पावसाळ्यात गळतात. अशीच परिस्थिती सगळ्याच आरोग्य केंद्रात आहे. रस्ते, संरक्षण भिंतीचे काम केले जाते. परंतु डॉक्टरांच्या गळक्या निवासस्थानांची दुरूस्ती करण्याकडे कोणाचेच लक्ष नाही. या क्वॉटर्समध्ये पावसाचे पाणी शिरते. ते पाणी मुरत असल्याने एखादवेळी हे क्वॉर्टर्स कोसळू शकतात. असा अपघात घडल्यास त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनच जबाबदार राहील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेकडून या आरोग्य केंद्रातील रस्त्याचे खडीकरण अनेकदा करण्यात आले. संरक्षण भिंतही बांधण्यात आली. परंतु क्वॉटर्सची दुरूस्ती मात्र, करण्यात आलेली नाही. याबाबत येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ एस.व्ही.निनावे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जुन्या क्वॉटर्सची दुरूस्ती करून पोस्टनुसार नवीन क्वॉटर्स तयार करण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. निनावे या प्राथमिक आरोग्य केंद्रात सन १९९७ पासून सेवारत आहेत. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोेगशाळा तंत्रज्ञ पदासाठी क्वॉटर्सच नाही. एकीकडे मुख्यालयी राहण्याची सक्ती केली जाते. मात्र, निवासस्थानही धड नसताना येथे राहणार कसे, असा सवाल येथील डॉक्टरांनी केला आहे. (प्रतिनिधी)