शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

गावपुढारी सरसावले, जोरबैठकांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:01 IST

६ ते १३ मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी १६ मार्च रोजी होईल. उमेदवारी अर्ज १८ मार्चपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हवाटप होईल. मतदान २९ मार्च रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.

ठळक मुद्दे२९ मार्च रोजी निवडणूक : जात प्रमाणपत्र असणाऱ्यांना प्राधान्य, आजी-माजी आमदारांचे वर्चस्व पणाला

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २९ मार्चला होत आहे. १३८ प्रभागांसाठी ३६६ सदस्यांची निवड होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने गाव पातळीवरील नेते कामाला लागले असून, गावातील राजकीय गट सक्रिय झाले आहे.यात तालुक्यातील टाकळी बु., लोणी, दहिगाव, हिवरा बु., दाभा, अडगाव, जावरा, जनुना, ढवळसरी, वाटपूर, सिद्धनाथपूर, धानोरा फशी, सारशी, कोठोडा, धानोरा गुरव, जामगाव, मांजरी म्हसला, एरंडगाव, सातरगाव, मोखड नांदसावंगी, खंडाळा खुर्द, वेणी गणेशपूर, कणी मिर्झापूर, पिंपरी निपाणी, कोहळा जटेश्वर, पापळ, पिंपरी गावंडा, फुबगाव, सेलू नटवा, शिवणी रसुलापूर, पहूर, वाढोणा रामनाथ, पिंपळगाव निपाणी, शिवरा, सालोड, खानापूर, मंगरूळ चव्हाळा, वाघोडा, सुलतानपूर, बेलोरा, धानोरा शिक्रा या $४४ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील गावांतील नेतेमंडळी तहसील कार्यालयात माहिती घेताना आढळून आले.कावली वसाड/ अंजनसिंगी : जिल्ह्यातील एकूण ५२६ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यानिमित्ताने गाव खेड्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. पॅनेल व पॅनेलमधील उमेदावार निवडण्यासाठी बैठकांचा रतीब घातला जात आहे.६ ते १३ मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी १६ मार्च रोजी होईल. उमेदवारी अर्ज १८ मार्चपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हवाटप होईल. मतदान २९ मार्च रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीअमरावती- ४६, मोर्शी ३९, धामणगाव रेल्वे- ५३, चांदूर रेल्वे- २८, तिवसा- २७, अंजनगाव सुर्जी- ३४, वरूड- ४१, भातकुली- ३४, चांदूर बाजार- ४१, दर्यापूर- ४८, चिखलदरा- १७, अचलपूर-४२, नांदगाव खंडेश्वर- ४४, धारणी- ३२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.वरूड : तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमध्ये २९ मार्च रोजी निवडणूक होऊ घातली आहे. एकूण ८७ हजार ३७२ मतदार ४१ सरपंच व सदस्यांचे भवितव्य ठरविणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमान शेतकरी संघटनेने ग्रामीण राजकारणात पाय रोवले असून, योग्य उमेदवारांचा शोध सुरू झाल्याचे चित्र आहे. निवडणुकीचा बिगूल वाजताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. वरूड तालुक्यातील मालखेड, धनोडी, पुसला, झटामझिरी, सातनूर, बहादा, रोशनखेडा, कुरळी, बेनोडा, लोणी, इत्तमगाव, करजगाव, गोरेगाव, पेठ मांगरुळी, टेंभूरखेडा, झोलंबा, राजुरा बाजार, अमडापूर, वाठोडा चांदस, चिंचरगव्हाण, पवनी, वडाळा, वघाळ, गाडेगाव, काटकुंभ, हातुर्णा, मांगरुळी, सुरळी, उदापूर, एकदरा, ढगा, घोराड, देऊतवाडा, आमनेर, उराड, सावंगी, वाई (खुर्द), गणेशपूर (जामठी), लिंगा या गावांचा समावेश आहे. तालुक्यातील सर्व गावांमध्ये राजकारण तापले आहे. पॅनेलप्रमुखांच्या घरी इच्छुकांच्या येरझारा वाढल्या आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक