शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

-तर ‘ते’ मुख्यालयी ‘अटॅच’

By admin | Updated: January 29, 2017 00:23 IST

निवडणुकीतील उमेदवारांशी नातेसंबध असणाऱ्या किंवा उमेदवारांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य

पोलीस आयुक्त : निवडणूक उमेदवाराशी नातेसंबध पडणार महागात अमरावती : निवडणुकीतील उमेदवारांशी नातेसंबध असणाऱ्या किंवा उमेदवारांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालयी ‘अटॅच’केले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली. अशा पोलिसांची माहिती काढण्याचे काम सुरु झाले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे इच्छुक व अपक्ष उमेदवारांची जय्यत तयारी सुरु आहे. यानिवडणुकीत उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये सर्वसाधारण नागरिकांसोबत पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांचे नातेवाईक सुद्धा आहेत. इतकेच नव्हे तर काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी सुद्धा निवडणूक रिंग्ांणात उतरणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली आहे. त्यामुळे हे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावताना नातेसंबध जोपासून नातलगांना प्रचारात सहकार्य करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय यापूर्वी सुद्धा असले प्रकार घडले आहेत. शासकीय कामातून वेळ काढून ते नातलग उमेदवारांची कामे करीत असल्याचे निदर्शनास आल्याने असले प्रकार रोखण्यासाठी ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नातेवाईक निवडणूक रिंगणात आहेत, अशा पोलिसांची यादी तयार करण्याची तयारी सुरु झाली असून या पोलिसांची पेशी पोलीस आयुक्तांसमोर केली जाणार आहे. या पोलिसांच्या उमेदवारांशी असलेल्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबधांची पडताळणी केल्यानंतर पोलीस आयुक्त त्यांना पोलीस मुख्यालयी ‘अटॅच’ करण्याचे निर्देश देणार आहेत. त्यामुळे निवडणूक तर पूर्णत: पारदर्शक होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. निवडणुकीतील उमेदवार जर पोलिसांच्या नातेसंबधातील असेल, तर अशा पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस मुख्यालयी अटॅज करण्यात येईल. यासंदर्भात माहिती काढण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.