शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बिबट्याने घेतला मोकळा श्वासं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:01 IST

कीर्र रात्रीचे दोन वाजले होते. लगतचे गाव गर्द झोपत असताना सुमारे २५ वन कर्मचारी व वनाधिकारी एखाद्या मंत्र्याला असलेल्या ‘झेडप्लस’ सुरक्षेप्रमाणे रस्त्याचे लोकेशन घेत होते. सर्वांच्या मनात धाकधुक, भिती जवळपास ५० कि.मी. नंतर पार करून ठरलेल्या ठिकाणी पिंजऱ्यात जेरबंद बिबट्याला मोकळा श्वास घेण्याची परवानगी मिळाली आणि कीर्र रात्री त्याने अलविदा करीत जंगलात धूम ठोकली.

ठळक मुद्देविहीर-पिंजरा अन् सुटका : २३ तासांनंतर वनविभागाची मोहीम फत्ते

लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : कीर्र रात्रीचे दोन वाजले होते. लगतचे गाव गर्द झोपत असताना सुमारे २५ वन कर्मचारी व वनाधिकारी एखाद्या मंत्र्याला असलेल्या ‘झेडप्लस’ सुरक्षेप्रमाणे रस्त्याचे लोकेशन घेत होते. सर्वांच्या मनात धाकधुक, भिती जवळपास ५० कि.मी. नंतर पार करून ठरलेल्या ठिकाणी पिंजऱ्यात जेरबंद बिबट्याला मोकळा श्वास घेण्याची परवानगी मिळाली आणि कीर्र रात्री त्याने अलविदा करीत जंगलात धूम ठोकली.शनिवारी रात्री १ वाजता पाण्याच्या शोधात बिबट विहिरीत जाऊन पडला. वनाधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. कीर्र रात्र डरकाळ्या फोडणारा तीक्ष्ण दाताचा बिबट पिंजºयात अडकवण्याचे कार्य पहाटे ६ वाजेपर्यंत चालले. अखेर एका कोंबडीच्या लालसेने तो पिंजºयात अडकला.'तो' बिबट परतला स्वगृहीलोकांच्या नजरा चुकवित त्या बिबट्याला एका वाहनाने पोहरा-चिरोडी वनक्षेत्रात आणले. त्याची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. दिवसभर तळ ठोकून असलेल्या अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी ज्या ठिकाणी तो बिबट पिंजऱ्यात अडकला त्याच वनक्षेत्रात सोडण्याचा निर्णय झाला आणि पोहरा जंगलातून रात्री ९ वाजता प्रवास सुरू झाला. ५० कि.मी. अंतरावर वाहनातून भारदस्त बिबट्या नेणे जोखमीचे होते. अशात त्याच्या दिमतीला एखाद्या मंत्र्यांप्रमाणे मागेपुढे वाहनांचा ताफा , २५ वनकर्मचारी, अधिकारी असा प्रवास सुरू झाला. गतिरोधक, गर्दी हे सर्व पार करीत अखेर बिबट्याला त्याच्या स्वगृही आणण्यात आले. समयसुचकता ठेवून वनकर्मचाऱ्यांनी वाहनात दडून बसत पिंजºयाचे दार उघडले व तो जंगलात दिसेनासा झाला. अखेर रात्री २ वाजता २३ तासांचे आॅपरेशन फत्ते झाले.