शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटासाठी त्याने पत्नीला उपाशी ठेवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:16 IST

पान १ अमरावती : सासरच्या मंडळीने मागणी केल्याप्रमाणे महागड्या हॉटेलमध्ये लग्न करूनही, वेळोवेळी मोठी रक्कम देऊनही आपला अनन्वित छळ ...

पान १

अमरावती : सासरच्या मंडळीने मागणी केल्याप्रमाणे महागड्या हॉटेलमध्ये लग्न करूनही, वेळोवेळी मोठी रक्कम देऊनही आपला अनन्वित छळ चालविल्याची तक्रार एका विवाहितेने गाडगेनगर पोलील ठाण्यात नोंदविण्यात आली. पत्नीमागे घटस्फोटासाठी तगादा लावून पतीने तिला उपाशी ठेवून मारहाण केली तथा घराबाहेर काढल्याचा मुद्दादेखील तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

अमरावती येथीलच एका तरुणीचा सन २०१६ मध्ये आरोपी शिशीर शरद किनकर (३४, रा. ३४, तळमेळे इस्टेट, त्रिमूर्ती नगर, अमरावती) याच्याशी झाला. त्यावेळी आरोपीने पीडिताच्या वडिलांना ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चेनची मागणी केली होती. ती पूर्ण करण्यात आली. आरोपीने लग्नाकरीता महागड्या हॉटेलसह महागड्या जेवणाची मागणी केली. ती कशीबशी पूर्ण केल्यानंतरही आरोपी शिशीरने वेळोवेळी मोठमोठ्या रकमेची मागणी केली. ऐपतीनुसार त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न पीडिताच्या माहेराने केला. मात्र, त्यानंतरही आरोपी पती हा आपल्याला खर्चाकरिता एक पैसाही देत नव्हता. त्याने आपल्याला अनेकदा उपाशी ठेवून मारहाण केली. घराबाहेर काढून दिले. थंडीत कुडकुडत बाहेर बसविण्याचे क्रूर वर्तनदेखील त्याने केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर पत्नीने घटस्फोट द्यावा, असा तगादा लावून मारहाण केली. ३ सप्टेंबर २०१६ पासून हा छळ सुरू होता. याप्रकरणी ११ ऑगस्ट रोजी दुपारी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. आरोपी शिशीर शरद किनकर याच्याविरुद्ध कलम ४९८ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

बॉक्स

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

लग्नामध्ये हुंड्याची व नंतर अवाजवी पैशाची मागणी करून पती व तीन महिलांनी आपल्याला मारहाण करून छळ केला, अशी तक्रार मालूनगर येथील माहेरवासिनीने नोंदविली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आरोपी स्वप्निल ज्ञानेश्वर कराळे (रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) व तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.