शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या रागावर ‘त्याने’ उलटवला आॅटो

By admin | Updated: February 18, 2017 00:07 IST

पत्नीला मारहाण केल्यानंतर मद्यपी पतीने हातात तलवार घेऊन धुमाकूळ घातला आणि आॅटोरिक्षांची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी सकाळी रामपुरी कॅम्प परिसरात घडली.

रामपुरी कॅम्प परिसरातील घटना : हातात तलवार घेऊन धुमाकूळअमरावती : पत्नीला मारहाण केल्यानंतर मद्यपी पतीने हातात तलवार घेऊन धुमाकूळ घातला आणि आॅटोरिक्षांची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी सकाळी रामपुरी कॅम्प परिसरात घडली. पोलीस सूत्रांनुसार, अशोकनगरातील रहिवासी नऱ्या ऊर्फ नरेश आत्राम याचा शुक्रवारी सकाळी पत्नीशी वाद झाला. त्यात नऱ्या आत्रामने पत्नीला बेदम मारहाण करीत दगडाने तिचे डोके फोडले. यानंतर चेकाळलेल्या नऱ्या आत्रामने रामपुरी कॅम्प परिसरातील नागरिकांना शिवीगाळ सुरू केली. हातात तलवार घेऊन त्याने रामपुरी कॅम्प परिसरातील मिठ्ठू चौकात उभ्या असलेल्या आॅटोरिक्षांची तोडफोड सुरू केली. दोन आॅटोरिक्षांच्या काचा फोडून त्याने दोन्ही आॅटो उलटविले. नऱ्या आत्रामच्या हातात तलवार असल्यामुळे कोणीही त्याला अडविण्यास धजावले नाही. अखेर या प्रकाराची माहिती काही नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.नऱ्या आत्रामचा हा धुमाकूळ तब्बल अर्धातास सुरू होता. काही वेळात ‘सीआर’ मोबाईल व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. आरोपी नऱ्या हा पोलिसांच्या अंगावरदेखील धावून गेला. काही वेळात गाडगेनगरचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड यांच्यासह काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा ताफा वाढत असल्याचे पाहून नऱ्या आत्रामने तेथून पळ काढला. याप्रकरणी नऱ्या आत्रामच्या पत्नीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी त्याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ४९८, ३२४, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. याप्रकारामुळे रामपुरी कॅम्प परिसरात खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)