शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्याने’ परतविले सापडलेले पाकीट, ‘सोशल मीडिया’ ठरला दुवा !

By admin | Updated: February 2, 2015 22:56 IST

सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत नेहमीच चर्चा सुरु असते. परंतु नाण्याची दुसरी बाजू नेहमीच दुर्लक्षित राहते. परंतु एका एसटी डेपो परिसरात सापडलेले पैशाचे पाकीट ‘फेसबुक’च्या माध्यमातून परत करून

जितेंद्र दखणे - अमरावतीसोशल मीडियाच्या गैरवापराबाबत नेहमीच चर्चा सुरु असते. परंतु नाण्याची दुसरी बाजू नेहमीच दुर्लक्षित राहते. परंतु एका एसटी डेपो परिसरात सापडलेले पैशाचे पाकीट ‘फेसबुक’च्या माध्यमातून परत करून एका तरूणाने प्रामाणिकपणाचा आगळा परिचय तर दिलाच. पण, सोशल मिडियाचा कसा सदुपयोग होऊ शकतो, याचे उदाहरणही घालून दिले. जिल्हा परिषदेत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत प्रमोद ताडे २५ जानेवारी रोजी अमरावती येथून त्यांच्या मूळ गावी म्हणजे अकोट तालुक्यातील निजामपूर येथे गेले होते. त्याच दिवशी सायंकाळी एसटीने परतीचा प्रवास करीत असताना त्यांचे पैशाचे पाकीट बसस्थानकावर हरविले. वाहकाने तिकीट काढण्यास सांगितले असता त्यांच्या लक्षात पाकीट हरविल्याची बाब आली. अचानकच हा प्रसंग ओढवल्यामुळे त्यांच्याकडे तिकिटासाठीही पैसे नव्हते. शेवटी सहप्रवाशांनी त्यांना धीर दिला. इतकेच नव्हे, तर श्रीनिवास उदापुरे यांनी माणुसकीचा परिचय देत त्यांचे प्रवास भाडे दिले. दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनाची सुटी असल्याने हरविलेल्या पाकिटातील एसबीआय व अलाहाबाद बँकेचे एटीएम ताडे यांनी २७ जानेवारी रोजी लॉक केले. एक दिवस अकस्मात त्यांच्या भ्रमणध्वनीवर रोशन मनोहरलाल गुप्ता नामक अमरावती येथील व्यक्तीचा कॉल आला. सदर व्यक्तीने त्यांना त्यांचे हरविलेले पाकीट सुरक्षित असल्याची माहिती दिली. ताडे यांना ही बातमी ऐकून सुखद धक्का बसला. परंतु पाकिटातील कागदपत्रांवर कुठेही मोबाईल नंबर नसताना गुप्ता यांनी तो कसा मिळविलाल हा प्रश्न ताडे यांना पडला होता. याबाबत विचारणा केल्यानंतर गुप्ता यांनी संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा केला. गुप्ता यांना पाकीट सापडल्यानंतर त्यांनी पाकिटातील एटीएम कार्डवरील नावाच्या आधारे प्रमोद ताडे यांचे फेसबुकवरील प्रोफाईल शोधले. त्यावरुन त्यांना त्यांची प्राथमिक माहिती मिळाली. परंतु प्रोफाईलवर ताडे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक नसल्याने त्यांनी त्यांची ‘फ्रेंडलिस्ट’ शोधली. त्यामधून अकोला येथील संतोष टाले या ताडे यांच्या मित्राचा मोबाईल नंबर त्यांना गवसला. या क्रमांकावर संपर्क करून त्यांनी ताडेंंचा क्रमांक मिळविला व पाकीट सुरक्षित असल्याचे सांगितले. ताडेंनी गुप्ता यांच्याकडे जाऊन पाकीट परत मिळविले. साधारण आर्थिक स्थिती असूनही दिलेले बक्षीस गुप्ता यांनी नाकारून प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण असल्याचे सिध्द केले.