शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

नियतीवर करायला मात त्याने पायांनाच बनवले हात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 22:59 IST

वयाच्या सातव्या वर्षी नियतीने घात केला. दोन्ही हात विजेच्या ताराच्या स्पर्शाने निकामी झाले.

ठळक मुद्देरक्षाबंधन विशेष : तन्मय-वंशिकाची कहाणी

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : वयाच्या सातव्या वर्षी नियतीने घात केला. दोन्ही हात विजेच्या ताराच्या स्पर्शाने निकामी झाले. तेव्हापासून संघर्षमय जीवनात त्याने पायांनाच हात बनवीत नियतीवर मात केली आहे.या लढाईत बहिणीची मिळालेली साथ कथन करताना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला त्याने आपल्या डोळ्यातील अश्रूधारेला वाट मोकळी करून दिली़भावाबहिणीच्या अतूट स्रेहाचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण मागील पाच वर्षांपासून विनाहाताने; पण आत्मविश्वास व सकारात्मक इच्छाशक्तीने १२ वर्षीय तन्मय मढावी हा साजरा करीत आहे़ तन्मयची कहाणी काळजाला भेदून जाणारी ठरली आहे. तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीचे गाव असलेले हिरपूर येथील हातावर आणून पानावर खाणाºया आदिवासी कुटुंबातील रणजित मढावी यांचा मुलगा तन्मय हा पाच वर्षांपूर्वी गावात ईरा भवनजवळ मित्रासोबत खेळत असताना अचानक विजेची तार त्याच्या डोक्यावर पडली. यात तो डोक्यापासून पायापर्यंत भाजला गेला तन्मयला प्रथम यवतमाळ, व तेथून नागपूर येथे दाखल करण्यात आले. खांद्यापासून हात कापण्याचा सल्ला नागपूरच्या डॉक्टरांनी दिला़ यावेळी गरीब असूनही साडेतीन लाखांचे कर्ज काढून जन्मदात्यांनी तन्मयला मुंबईला हलविले. तब्बल तिथे दीड महिना दवाखान्यात ठेवून मृत्यूच्या दाडेतून जन्मदात्यांनी तन्मयला जीवदान दिले. मात्र या संघर्षात त्याला दोन्ही हात गमवावे लागले.भावाच्या संघर्षाला बहिणीची साथबहिणभावाच्या अतूट उत्कंठ प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन या दिवशी राखी बांधावी भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या भावाने आपले रक्षण करावे या मागची मंगल मनोकामना असली तरी आपल्या भावाचे रक्षण व त्याच्या क्षणाक्षणाला लागणाºया बाबीसाठी तन्मयची लहान तिसºया वर्गात शिकणारी बहिण धावपळ करते़ तन्मयला हात नसल्यामुळे केशरचना करणे, स्रान करणे, शौच धुऊन देणे, असा दैनंदिन उपक्रम वंशिका करून देत आहे़ नियतीने माझ्या भावाला दिव्यांग आणले पण मी पूर्णपणे त्याचा सांभाळ करू शकते, असा आत्मविश्वास ती व्यक्त करते़ तन्मयची कहाणी ऐकताना पापण्यांच्या कडा कधी ओलावतात ते समजत नाही़ दोन्ही हाताशिवाय जीवन जगणाºया तन्मयचे भविष्य काय, या विचाराने प्रथम मढावी कुटुंब हळहळले. पण आपल्या सदगदीत भावनांना मुरड घालून त्यांनी तन्मयचे संगोपन काळजीपूर्वक केले. त्याच्या बालमनावर परिणाम होऊ नये म्हणून जन्मदाते आजही काळजी घेतात़ तन्मयने हातासाठी आसव गाळत बसण्यापेक्षा पायांनी व ढोपरपर्यंत असलेल्या भागांनी आयुष्य जगण्याला सुरूवात केली़ गावातच जि़ल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सातवीत तो शिक्षण घेत आहे़ पायांना हात बनवित पेन्सील धरून अक्षर गिरवीत आहे़ क्रिकेटसह इतर खेळात तो तरबेज आहे़ आयुष्याला ओंजळीत नियतीने अपंगत्व टाकले. डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी हात नसले तरी स्वत:च्या पायावर उभे राहून भविष्यात जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न तन्मय पाहतो आहे़