शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ चढला पाण्याच्या टाकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:34 IST

वडिलांच्या हत्या प्रकरणातील तपास अधिकारी एपीआय महेश नरवणे यांच्याकडील तपास पूर्ववत करावा, या मागणीसाठी अब्दुल शारूख अब्दुल करीम (२२,रा. मिर्झापुरा, वलगाव) रविवारी आठवडी बाजारातील पाण्याच्या टाकीवर चढल्याने खळबळ उडाली.

ठळक मुद्देवलगाव सरपंच हत्याप्रकरण : तपासाला गती मिळण्यासाठी विरुगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वडिलांच्या हत्या प्रकरणातील तपास अधिकारी एपीआय महेश नरवणे यांच्याकडील तपास पूर्ववत करावा, या मागणीसाठी अब्दुल शारूख अब्दुल करीम (२२,रा. मिर्झापुरा, वलगाव) रविवारी आठवडी बाजारातील पाण्याच्या टाकीवर चढल्याने खळबळ उडाली. दुपारी १ वाजताच्या सुमारास सुरू झालेले हे विरुगिरीचे नाट्य एपीआय नरवणे यांच्याकडे तपास देण्याच्या आश्वासनानंतर संपुष्टात आले.२३ नोव्हेंबर २०१६ रोजी वलगावात सरंपच हत्याकांड घडले होते. या घटनेला पावणेदोन वर्षे झाले. तपास अधिकारी महेश नरवणे यांचीही बदली झाली. मात्र पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांशी बोलल्यानंतरच टाकीवरून खाली उतरेन, असा पावित्रा अब्दुल शारुख याने घेतला. अब्दुल हा रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वलगावच्या आठवडी बाजार परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढला. त्याने मोबाईलवरून एका व्हॉटसअ‍ॅप समूहावर व्हिडीओ व्हायरल केला. त्यात त्याने वडील अब्दुल करीम अब्दुल जलील यांच्या हत्येच्या घटनेचा उल्लेख करून या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याबाबत भाष्य केले. या घटनेच्या माहितीवरून वलगावचे ठाणेदार दुर्गेश तिवारी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी अब्दुलला समजाविण्याचे प्रयत्न केला. मात्र, आपल्या मागणीवर तो ठाम होता. त्यामुळे याची माहिती तिवारी यांनी वरिष्ठांनी दिली. अग्निशमन दलाची मदतीने अब्दुलला टाकीवरून खाली उतरविण्यात आले. पोलिसांनी तपास नरवणे यांच्याकडे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अब्दुल टाकीवरून खाली उतरला.पालकमंत्री, सीपींना बोलवाअब्दुल शारुख टाकीवर चढल्यानंतर त्याने एक चिठ्ठी खाली फेकली. त्या चिठ्ठीत पालकमंत्री व पोलीस आयुक्तांना बोलवा, त्यांच्याशी बोलल्यानंतरच मी खाली उतरेन, असे नमूद केले होते. त्या अनुषंगाने पीआय तिवारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाददेखील साधला.वलगाव सरपंच हत्याकाडाच्या तपासाला गती मिळावी, तपास अधिकारी एपीआय नरवणेकडे तपास द्यावा, यासाठी अब्दुल शारुख टाकीवर चढला. आश्वासनानंतर तो खाली उतरला.- दुर्गेश तिवारी,पोलीस निरीक्षक