शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी ‘तो’ बनला ‘आरटीओ’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:10 IST

फोटो पी १९ चांदूरबाजार विक्रीसाठी नेमलेत एजंट : बनावट आरसी बनवून चोरीच्या वाहनांची विक्री प्रदीप भाकरे अमरावती: चोरीचे वाहन ...

फोटो पी १९ चांदूरबाजार

विक्रीसाठी नेमलेत एजंट : बनावट आरसी बनवून चोरीच्या वाहनांची विक्री

प्रदीप भाकरे

अमरावती: चोरीचे वाहन सहजासहजी कुणी विकत घेत नाही, जुने वाहन खरेदी करत असताना वाहनाची आरसी (रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट) देखील पाहिली जाते. सबब, ‘त्या’ चोरांसमोर चोरीच्या दुचाकीच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला. मग काय, चोरांच्या टोळीतील एक तरूणच खुद्द ‘आरटीओ’ बनला. अन् सुरू झाला वाहनांची बनावट आरसी बनविण्याचा गोरखधंदा. त्यातून चक्क ३१ चोरीच्या दुचाकींची विक्री करण्यात आली.

शिरजगाव बंड येथील एका २४ वर्षीय आरोपीने चोरीच्या वाहनांची बनावट आरसी बनवून ग्राहकांना देत असल्याच्या कबुलीजबाबानंतर हा प्रकार उघड झाला. अन् काही वेळासाठी पोलीस यंत्रणा देखील अवाक झाली. त्यामुळे आता आरोपींच्या पोलीस कोठडीदरम्यान अनेक नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.

चांदूरबाजार, ब्राम्हणवाडा थडी व चांदूरबाजार या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलिकडे दुचाकी चोरांनी धूम केली. विविध गुन्हे देखील दाखल झालेत. पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी तीनही पोलीस ठाणे प्रमुखांचा ‘क्लास’ घेतला. बरहुकूम, तीनही पोलीस ठाण्यांनी संयुक्त अभियान राबवून माहितीची जमावाजमव केली. यात पहिल्यांदा हाती आला तो सोनोरीचा उज्वल बोराडे. एकामागून एक नावे समोर येत गेली. त्यातच एका आरोपीने चोरीच्या दुचाकी दोन एजंटला विक्रीसाठी दिल्याची माहिती समोर आली. एक एक करत चोरांची संख्या पोहोचली सातवर. त्यांचेकडून तब्बल २० लाख ३० हजार रुपये किमतीच्या २९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर बनावट आरसी बनवून त्या विकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. अन् सरफराज मन्सूर अली शहा (२४, शिरजगाव बंड) याला गजाआड घेण्यात आले. गजाआड असताना त्याने बनावट आरसी बनवून ती ग्राहकांना बनवून देत असल्याची कबुली दिली.

आरटीओच्या संकेतस्थळाचा घेतला आधार

वाहनाचा मालक, वाहन घेतल्याची दिनांक, वाहनाचा प्रकार असे एका क्लिकवर सांगणारे आरटीओचे एक अ‍ॅप आहे. त्यात वाहन क्रमांक टाकल्यास वाहनांची इत्यंभूत माहिती समोर येते. त्या अ‍ॅपचा आधार घेऊन आरोपी सरफराज मन्सूरअली शहा याने बनावट आरसी बनविण्याचा गोरखधंदा के ला, असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. चोरीच्या वाहन विक्रीसाठी त्याने किती बनावट आरसी बनविल्या, त्या बनावट आरसीच्या आधारे किती वाहनांची विक्री झाली, हे तपासात समोर येणार आहे.

आरोपी तरूण, नवखे अन् एकाच तालुक्यातील

दुचाकी चोरीचे रॅके ट गजाआड केल्यानंतर त्या सात जणांविरूद्ध कुठे गुन्हे दाखल आहेत का, याबाबत माहिती घेण्यात येत आहे. मात्र, अद्यापतरी त्यांच्याविरूद्ध असे कुठलेही गुन्हे नोंद नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे सातही आरोपी केवळ २१ ते २८ या वयोगटातील व चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी, पिंपरी, हैदतपूर वडाळा, शिरजगाव बंड, माधान या शेजारी गावांतील आहेत.

आणखी दोन दुचाकी जप्त

१८ जून रोजी अटक सात आरोपींकडून २९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. तर त्यानंतर आणखी दोन दुचाकी जप्त करण्यात आल्याने चोरीच्या दुचाकींची संख्या ३१ वर पोहोचली आहे. त्या दोन दुचाकी धारणी व चांदूरबाजार येथून जप्त करण्यात आल्या.

कोट

दुचाकी चोरीप्रकरणी शुक्रवारी सात तरूण आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील एका आरोपी वाहनांची बनावट आरसी बनवत होता. त्याने ती कल्पना एका अ‍ॅपवरून उचलली होती, अशी कबुली दिली आहे.

सुनील किनगे,

ठाणेदार, चांदूरबाजार

-----