शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आईनंतर त्यानेही घेतला जगाचा निरोप, प्रयत्न पडले थिटे

By admin | Updated: August 10, 2014 22:43 IST

मेळघाटात बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या शेकडो योजनांद्वारे होत असलेला कोट्यवधींचा खर्च व्यर्थ ठरत असल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. बाळ जन्मत:च माता दगावली. आईविना ते कुपोषित

उपचाराचा अभाव : मेळघाटात कोवळी पानगळ सुरूचनरेंद्र जावरे - चिखलदरामेळघाटात बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या शेकडो योजनांद्वारे होत असलेला कोट्यवधींचा खर्च व्यर्थ ठरत असल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. बाळ जन्मत:च माता दगावली. आईविना ते कुपोषित बालक अडीच महिने जिवंत राहिले. मात्र वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने शनिवारी रात्री १ वाजता त्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनीष मनिराम कास्देकर (अडीच महिने, रा. सोनापूर, ता. चिखलदरा) असे मृत बालकाचे नाव आहे. मे महिन्यात सुंदर मनिराम कास्देकर या गर्भवती असताना प्रसूतीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर, परिचारिका व एम. पी. डब्ल्यूने तिला प्रसुतीपूर्वी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. तिला टेंब्रुसोंडा आरोग्य केंद्र व तेथून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले परंतु ती प्रसूतीसाठी घरीच आली. प्रसूतीच्या असह्य वेदना सहन करीत तिने गोंडस बाळाला जन्म दिला आणि यात दरम्यान तिचा मृत्यू झाला. आईविना मनीषची देखभाल वडील, आजी, आजोबांनी केली. त्याला गाईचे दूध मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात आला; मात्र गाईचे दूध मिळत नसल्याने अखेर म्हशीचे दूध देऊन त्याची भूक भागविण्याचा प्रयत्न केला. पण त्याला म्हशीचे दूध पचत नव्हते. त्यामुळे अडीच महिन्यांत त्याची प्रकृती अनेकवेळा खालावली. दरम्यान येथील ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करून त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी आर. व्ही. लोणारे, परिचारिका शुभांगी पोहेकर, रितेश धवने यांनी या बाळाला शनिवारी सायंकाळी ६ वाजता टेंब्रुसोंडा आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु प्रकृतीत सुधारणार होत नसल्यामुळे तेथून त्याला अचलपूर व जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा १ वाजता मृत्यू झाला. मनीषच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.