शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

सरत्या आयुष्याला हातोडा-छन्नीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 22:20 IST

तीन दशके जनसामान्यांसमोर नाट्यकला सादर केल्यानंतर ८५ वर्षीय वृद्ध कलावंताला सरत्या आयुष्यात हातोडा-छन्नीचा आधार घ्यावा लागला. चक्की टकाई करून पोट भरण्याची पाळी या कलाकारावर आली आहे.

ठळक मुद्देनाट्यकलावंताची परवड : चक्की टकाईने भरतो पोट

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तीन दशके जनसामान्यांसमोर नाट्यकला सादर केल्यानंतर ८५ वर्षीय वृद्ध कलावंताला सरत्या आयुष्यात हातोडा-छन्नीचा आधार घ्यावा लागला. चक्की टकाई करून पोट भरण्याची पाळी या कलाकारावर आली आहे.तालुक्यातील तीन हजार लोकसंख्येचे विरुळ रोंघे छोटेसे गाव. राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील; मात्र खरी ओळख लोककलेतील कलावंतांचे माहेरघर म्हणून. तथापि, सध्या उपेक्षित कलावंतांचे गाव म्हणून ही ओळख पुढे आली आहे. येथील वृद्ध कलावंत नामदेव गुल्हाने यांची कथा ही जगावेगळी आहे. सन १९५७ साली ‘रायगडची राणी’ या नाटकात नामदेव गुल्हाने यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर अनेक नाटकांत विविध पात्रांत ते दिसले.आयुष्यभर नाटकातून प्रेक्षकांना हसविणाऱ्या गुल्हाने यांच्यावर वृद्धपकाळात दिवसभर चक्की टकाई करून आलेल्या पैशांतून पोट भरण्याची वेळ आली आहे. कधी शंभर, तर कधी दीडशे रुपयांत त्यांना गुजराण करावी लागत आहे.'संसार हा सुखाचा'ने गाजविला महाराष्ट्रनागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे यासह मोठ्या शहरांत ‘पंताची सून’, ‘रायगडची राणी’, ‘सख्खे भाऊ - पक्के वैरी’, ‘पुढाºयांच्या गावगुडी तिढा’, ‘कन्या सासुराशी जाये’ असे तब्बल शंभरापेक्षा अधिक नाटक गतकाळात सादर केली आहेत. या गावातील महादेव बुटले, रामचंद्र गेडाम, भीमराव सावकार, भीमराव सावंत, गजानन किन्हिकर श्रीपाद गोमासे, नामदेव उगले या कलावंतांनी नावलौकिक केला.कलावंताचे गावभारतीय कला संस्कृतीचा वारसा जोपासण्याचे काम विरूळ रोंघे या गावाने केले. मराठमोळे लोकनृत्य, लोकनाट्य, लोकसंगीत यातून समाजप्रबोधन करण्यात येथील कलावंत नेहमीच अग्रेसर आहेत. हे काम आता तरुण पिढीनेही हाती घेतले आहे.आज डोळे साथ देतात म्हणून टकाई करू शकतो. हाताला हातोडा लागतो, पण पर्याय नाही. शासनाकडून मानधन मिळावे म्हणून अर्ज केले. मात्र, एक रुपयाचे मानधन मिळाले नाही.- नामदेव गुल्हाने, नाट्यकलावंत, विरूळ रोंघे