शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

हर्षेंची ‘राजकीय’ घुसखोरी प्रशासनावर वरचढ !

By admin | Updated: April 22, 2017 00:23 IST

महापालिकेत अधिकारी - कर्मचाऱ्यांना प्रशासकीय शिस्त लागावी, यासाठी जोरकस प्रयत्न करणाऱ्या आयुक्तांच्या

‘जीएडी’ला जुमानेनात : झोन सभापतींच्या पदग्रहण सोहळ्यात सहभागी अमरावती : महापालिकेत अधिकारी - कर्मचाऱ्यांना प्रशासकीय शिस्त लागावी, यासाठी जोरकस प्रयत्न करणाऱ्या आयुक्तांच्या भूमिकेला गजेंद्र हर्षे या कर्मचाऱ्याने हरताळ फासला आहे. जीएडीमध्ये कार्यरत असलेल्या हर्षेंनी राजरोसपणे राजकीय घुसखोरी चालविली असून त्यांना साधी शो-कॉज बजावण्याचे धाडसही प्रशासन करु शकले नाही. आयुक्तांच्या ४ फेब्रुवारी २०१७ च्या आदेशान्वये गजेंद्र हर्षे यांची मध्य झोन क्र. २ मधून सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ लिपिक या पदावर बदली करण्यात आली. शनिवारी बदली झाल्यावर लगतच्या सोमवारी त्यांच्या वैद्यकीय रजेचा अर्ज मंजूर करण्यात आला. मात्र प्रचाराकरिता महापालिका कर्मचाऱ्याला ‘फ्री हँड’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच ते परतले. निवडणूक रिंगणातील आप्तांच्या प्रचाराकरिता त्यांना रजा हवी होती. मात्र ती मिळू न शकल्याने ते ‘जीएडी’त रुजू झाले. त्यांच्या आप्त निवडणुकीत जिंकूनही आल्या व नगरसेविका बनल्या. त्यामुळे ते आता अधिकच रिलॅक्स झाले आहेत. १७ एप्रिलला तर ते चक्क ‘सीएल’ टाकून राजकीय कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांना विचारण्याचे धाडस जीएडीतील अधिकाऱ्यांकडून झाले नाही. लविना हर्षे या झोन सभापती म्हणून झोन २ चा पदभार स्वीकारत असताना गजेंद्र हर्षे पूर्णवेळ त्या राजकीय कार्यक्रमात होते. त्यांनी फोटोसेशनही करुन घेतले. वास्ताविक शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक आणि शिस्त व अपील नियम १९७९ नुसार आचारसंहिता पाळणे बंधनकारक आहे. ‘कॅज्युअल लिव्ह’ टाकूनही कर्मचारी राजकीय पदग्रहण वा अन्य कार्यक्रमात सहभागी होवू शकत नाही. हर्षे हे १७ एप्रिलला लविना हर्षे यांच्या बाजुला उभे राहून फोटोसेशन करुन घेत असताना प्रशासनाने ध्रुतराष्ट्राची भूमिका घेतली. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे धारिष्ट्य प्रशासन करु शकले नाही. (प्रतिनिधी)